
जर तुम्ही मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) आयुक्तांच्या मान्यतेने, सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत विविध नवीन रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका व सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रसिद्ध केली आहे. ही संधी म्हणजे आरोग्य क्षेत्रात काम करण्याची आणि मुंबई शहराच्या सेवेत योगदान देण्याची एक चांगली संधी आहे, ज्याचा तुम्ही पुरेपूर फायदा करून घ्यावा!
या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून लगेच सुरू झाली आहे. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक ०२ डिसेंबर २०२५ आहे, त्यामुळे वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे, ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची प्रत आणि आवश्यक कागदपत्रे प्रमुख वैद्यकीय अधिकारी (प्र), पंडित मदन मोहन मालविय शताब्दी रुग्णालय, वामन तुकाराम मार्ग, गोवंडी (पू), मुंबई – ४०० ०८८ या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार भिन्न आहे. त्यामुळे, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरातीमध्ये रिक्त पदे, पात्रता आणि इतर सर्व आवश्यक माहिती सविस्तर दिली आहे. अधिक माहिती आणि ऑनलाइन अर्ज लिंकसाठी खालील माहिती तपासा. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक वरती दिली आहे.
