महाराष्ट्र वीज नियामक आयोग (MERC) भरती 2025 | मासिक वेतन : 44,900 रुपये | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

वीज क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी आणि एका चांगल्या संधीच्या शोधात असलेल्यांसाठी ही एक महत्त्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोग म्हणजेच MERC ने आपल्या नियामक आणि तांत्रिक विभागातील ‘स्तर-III’ च्या जागा भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे इथे मिळणारे वेतन. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 44,900 रुपये ते 1,42,400 रुपयांच्या दरम्यान पगार मिळणार आहे, जो आर्थिक स्थैर्य देण्यासाठी नक्कीच पुरेसा आहे. जर तुमचे वय 35 वर्षांच्या आत असेल, तर तुम्ही या संधीचा नक्कीच विचार करायला हवा. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली देण्यात आली आहे.

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या गरजेनुसार वेगवेगळी असू शकते, त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात वाचून स्वतःची पात्रता तपासून घेणे गरजेचे आहे. अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत ऑनलाईन आहे, त्यामुळे तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. मात्र, तारखेचे गणित लक्षात ठेवा. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 16 डिसेंबर 2025 आहे. शेवटच्या दिवशी होणारी गडबड टाळण्यासाठी लवकरात लवकर अधिकृत माहिती पाहून अर्ज भरून मोकळे व्हा. PDF जाहिरात व अर्ज लिंक खाली वरती पहा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा