
आरोग्य सेवेला बळकट करण्यासाठी जिल्हा परिषदेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. सध्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रिक्त पदे असल्याने रुग्णांच्या सेवेत अनेक अडचणी येत आहेत. हीच गरज ओळखून रिक्त भरण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुमची लोकांची सेवा करण्याची इच्छा असेल, तर ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. विशेष म्हणजे या पदासाठी निवड झाल्यास उमेदवारांना ४०,००० ते ७५,००० रुपये इतके सन्मानजनक मासिक मानधन दिले जाणार आहे, ज्यामुळे आर्थिक स्थैर्यासोबतच समाजसेवेचे समाधानही मिळेल. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिल्या आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
सुरुवातीला उमेदवारांना दिलेल्या गुगल लिंकवर (Google Link) जाऊन आपली सर्व माहिती भरावी लागेल. हा ऑनलाइन फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमच्या ईमेलवर एक भरलेला अर्ज येईल. त्याची प्रिंट काढून, आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडून तो अर्ज प्रत्यक्ष किंवा पोस्टाने सादर करायचा आहे. ही दुहेरी प्रक्रिया पूर्ण केल्यावरच तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाईल.
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांकडे एमबीबीएस (MBBS) किंवा बीएएमएस (BAMS) ही शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. अनुभवी डॉक्टरांनाही संधी मिळावी म्हणून वयोमर्यादा ५८ वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, ती नीट समजून घेणे गरजेचे आहे.
उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ डिसेंबर २०२५ आहे. तुमचे अर्जाची हार्ड कॉपी आणि कागदपत्रे ‘आरोग्य विभाग, जिल्हा परिषद भंडारा, प्रशासकीय इमारत, राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३, भंडारा – ४४१९०४’ या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. भंडारा जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करण्याची आणि थेट आरोग्य यंत्रणेचा महत्त्वाचा भाग बनण्याची ही संधी नक्कीच विचार करण्यासारखी आहे. अधिक स्पष्टतेसाठी मूळ जाहिरात वाचून मगच अर्ज प्रक्रियेला सुरुवात करावी. जाहिरात वरती दिली आहे.
