भारतीय डाक विभागात 10वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती | आजचं अर्ज करा.

भारतीय डाक विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी. जर तुम्ही दहावी पास असाल तर डाक विभागाच्या टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा योजनांचे प्रतिनिधी म्हणून काम करण्याची ही संधी नक्कीच तुमच्यासाठी आहे. या भरतीसाठी विशेष म्हणजे केवळ बेरोजगार तरुणच नाही, तर निवृत्त शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, महिला बचत गटातील सदस्या, माजी सैनिक किंवा स्वयंरोजगार करणारे १८ ते ५० वयोगटातील कोणतेही इच्छुक नागरिक यासाठी अर्ज करू शकतात. तुम्हाला फक्त स्थानिक भागाची माहिती, संवाद कौशल्य आणि थोडंफार संगणकाचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

यासाठी कोणतीही लेखी परीक्षा नसून निवड थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. मुलाखती ५ जानेवारी ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत अक्कलकोट, बार्शी, मोहोळ आणि सोलापूर प्रधान डाक घर या ठिकाणी पार पडतील. मुलाखतीला जाताना वरिष्ठ अधीक्षक, सोलापूर विभाग यांच्या नावाने लिहिलेला अर्ज, आधार कार्ड, पॅन कार्ड, तीन फोटो आणि शैक्षणिक कागदपत्रांच्या मूळ व झेरॉक्स प्रती सोबत नेणे गरजेचे आहे. निवड झाल्यानंतर उमेदवारांना ५००० रुपये सुरक्षा अनामत रक्कम म्हणून जमा करावी लागेल आणि IRDA ची ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागेल, ज्यासाठी खात्यामार्फत प्रशिक्षणही दिले जाईल. त्यामुळे कागदपत्रांची तयारी करा आणि दिलेल्या तारखांना मुलाखतीसाठी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्या.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo