आरोग्य विभागात ‘डाटा एंट्री ऑपरेटर’ भरती 2025: महिना 18,000 रुपये पगाराची संधी! | आजचं अर्ज करा.

नमस्कार मित्रांनो! जर तुम्ही आरोग्य विभागात काम करण्याची इच्छा बाळगून असाल, तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. जिल्हा परिषद पालघरच्या ‘जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी’ मार्फत ‘डाटा एंट्री ऑपरेटर’ या पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही नोकरी मिळवणे म्हणजे आरोग्य यंत्रणेचा एक भाग बनण्याची चांगली संधी आहे. ज्यांची निवड होईल, त्यांना दरमहा 18,000 रुपये इतके निश्चित वेतन मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज कसा करायचा? तर, ही प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन आहे. तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज भरून तो 26 डिसेंबर 2025 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

तुम्ही पात्र असाल तर आजचं अर्ज करा. ‘जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, पालघर आरोग्य विभाग, जिल्हा परिषद पालघर’ या पत्त्यावर पोहोचवणे आवश्यक आहे. या पदासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागते, हे सविस्तर पाहण्यासाठी खाली दिलेली अधिकृत PDF जाहिरात एकदा नक्की तपासा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पात्र किंवा अपात्र उमेदवारांची यादी आणि पुढील प्रक्रियेचे सर्व अपडेट्स फक्त www.zppalghar.gov.in या अधिकृत वेबसाईटवरच प्रसिद्ध केले जातील. तुम्हाला वेगळे पत्र पाठवले जाणार नाही, त्यामुळे वेबसाईटवर लक्ष ठेवा. ही संधी हातातून जाऊ देऊ नका, लवकरात लवकर अर्ज सादर करा. तुम्हाला खूप शुभेच्छा!


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo