
लोकांचे प्राण वाचवण्याचे महत्त्वाचे आणि धाडसाचे काम करण्याची इच्छा आहे का? तर तुमच्यासाठी एक उत्कृष्ट संधी आहे. महानगरपालिका अग्निशमन दलात गट-क आणि गट-ड संवर्गातील एकूण 186 रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये चालक – यंत्रचालक/वाहनचालक (अग्निशमन) आणि फायरमन (अग्निशामक) या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. जर तुमची शैक्षणिक पात्रता १०वी उत्तीर्ण आणि इतर आवश्यक निकष पूर्ण करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १९,००० रुपये ते ६३,२०० रुपये पर्यंत चांगलं मासिक वेतन मिळणार आहे. या भरतीची PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली.
| शुध्दीपत्रक (मुदतवाढ) | येथे क्लीक करा |
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
तुम्ही पात्र असाल तर, अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे, आणि अर्ज १० नोव्हेंबर २०२५ पासून सुरू झाले आहेत. वयोमर्यादा १८ ते २८/३८ वर्षांपर्यंत आहे. या सेवेत येण्यासाठी किमान शारीरिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे: पुरुषांसाठी उंची १६५ सें.मी., छाती साधारण ८१ सें.मी. (फुगवून ५ सें.मी. जास्त), आणि वजन ५० कि.ग्रॅम तर महिलांसाठी उंची १५७ सें.मी. आणि किमान वजन ४६ कि.ग्रॅम असणे आवश्यक आहे. दृष्टी चांगली असणे गरजेचे आहे. अर्ज शुल्काचा विचार केल्यास, खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये आणि मागास प्रवर्गासाठी ९०० रुपये शुल्क आहे. ही भरती नाशिक शहर येथे होणार आहे. त्यामुळे, लवकरात लवकर अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
