
बँकिंग क्षेत्रात करिअर सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण पदवीधरांसाठी पुणे पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेने एक मस्त संधी आणली आहे. बँकेने नुकतीच एक जाहिरात प्रसिद्ध केली असून, त्यानुसार ‘लेखनिक’ म्हणजेच लिपिक या पदासाठी तब्बल ८० नवीन जागा भरल्या जाणार आहेत. आजच्या स्पर्धेच्या काळात स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आणि कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ही भरती नक्कीच फायदेशीर ठरू शकते. विशेषतः जे तरुण नुकतेच शिक्षण पूर्ण करून चांगल्या संधीच्या शोधात आहेत, त्यांनी या जाहिरातीकडे गांभीर्याने पाहायला हवे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
आता या नोकरीसाठी नेमकी पात्रता काय आहे ते पाहूया. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे गरजेचे आहे. वयोमर्यादेचा विचार करता 22 ते 28 वर्षे वयोगटातील तरुण-तरुणी यासाठी अर्ज करू शकतात. निवड झाल्यानंतर उमेदवारांना दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण करावा लागेल. या काळात आणि त्यानंतर कामाच्या स्वरूपानुसार उमेदवारांना १५,००० ते २०,००० रुपये मासिक वेतन दिले जाईल. अर्ज करताना उमेदवारांना १४१६ रुपये परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे, याची नोंद घ्यावी.
ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जात आहे. तुमच्याकडे अर्ज करण्यासाठी 27 जानेवारी 2026 पर्यंतच मुदत आहे. अनेकदा आपण शेवटच्या तारखेची वाट पाहतो आणि ऐनवेळी वेबसाइटवर लोड आल्याने संधी हुकते. त्यामुळे तसे न करता लवकरात लवकर आपली नोंदणी पूर्ण करा. अर्ज भरण्यापूर्वी एकदा अधिकृत पीडीएफ जाहिरात शांतपणे वाचा, सर्व अटी समजून घ्या आणि मगच पुढचे पाऊल टाका. पुण्यात नोकरी मिळवण्याची ही संधी दवडू नका.
