वनविभागात नोकरीची सुवर्णसंधी : बारावी व इतर पात्रता उत्तीर्ण उमेदवारांसाठी २० ते ६० हजार पगाराची भरती | आजचं अर्ज करा.

महाराष्ट्र वनविभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयाने नवीन पदभरती जाहीर केली असून, यामुळे अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार आहे. विशेषतः ज्यांचे बारावी व इतर आवश्यक पात्रता पर्यंतचे शिक्षण झाले आहे, अशा उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदांनुसार २०,००० ते ६०,००० रुपयांच्या दरम्यान मासिक मानधन दिले जाईल, जे करिअरच्या सुरुवातीला नक्कीच दिलासादायक आहे. या भरतीची PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवाराचे वय ३५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे. जरी बारावी उत्तीर्ण ही प्रमुख अट असली, तरी पदांनुसार इतर काही तांत्रिक पात्रता किंवा अटी असू शकतात. त्यामुळे कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून अर्ज भरण्यापूर्वी एकदा अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचून आपली पात्रता तपासून घेणे शहाणपणाचे ठरेल. अर्ज करण्याची पद्धत अतिशय सोयीस्कर आणि लवचिक ठेवण्यात आली आहे. तुम्ही तुमचा अर्ज ऑनलाइन म्हणजेच ईमेलद्वारे किंवा ऑफलाइन पद्धतीने थेट कार्यालयात जमा करू शकता.

जर तुम्ही ईमेलचा पर्याय निवडला तर ‘forest.satara68@gmail.com‘ या आयडीवर अर्ज पाठवू शकता. आणि जर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष अर्ज द्यायचा असेल, तर ‘उपवनसंरक्षक कार्यालय, सातारा वन विभाग, वन भवन, गोडोली नर्सरी परिसर, सातारा – ४१५००१’ या पत्त्यावर तो पोहोचवला पाहिजे. एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवा, ती म्हणजे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ०८ जानेवारी २०२६ आहे. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट पाहत बसू नका. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत pdf जाहिरात वाचा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo