
मुंबईच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजेच बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) नोकरी मिळवणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. ही संधी आता तुमच्यासाठी चालून आली आहे. पालिकेने ‘गट-ड’ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही पूर्णपणे कायमस्वरूपी सरकारी नोकरी असून, 10वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना यामध्ये सहभागी होता येईल. शिक्षणाची अट कमी असली तरी मिळणारे वेतन मात्र खूप चांगले आहे. निवड झाल्यानंतर उमेदवारांना १८,००० ते ५६,९०० रुपये या श्रेणीत मासिक पगार मिळेल, जो मुंबईसारख्या शहरात करिअरची सुरुवात करण्यासाठी नक्कीच आश्वासक आहे. भरतीची अधिकृत PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
या भरतीसाठी वयोमर्यादेचे निकषही लवचिक ठेवण्यात आले आहेत. १८ वर्षे पूर्ण असलेल्या आणि ३८ वर्षांपर्यंत वय असलेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज करता येईल. तसेच, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. अर्जासोबत परीक्षा शुल्क भरणे अनिवार्य असून, खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये फी आहे, ज्यामध्ये जीएसटीचाही समावेश आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असल्याने तुम्हाला घरबसल्या अर्ज करता येईल. इच्छुक उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १८ फेब्रुवारी २०२६ ही आहे.
