आकाशवाणी पुणे मध्ये नवीन भरती; पदवीधरांना मोठी संधी | आजचं अर्ज करा.

पुण्यात राहून मीडिया किंवा ब्रॉडकास्टिंग क्षेत्रात काम करण्याची तुमची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आली आहे. भारत सरकारचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या प्रसार भारती म्हणजेच ‘आकाशवाणी पुणे’ मध्ये सध्या नवीन भरती सुरू झाली आहे. खास करून प्रादेशिक वृत्त विभागात काम करण्यासाठी हे अर्ज मागवले जात आहेत. सरकारी संस्थेत आणि ऑल इंडिया रेडिओसारख्या मोठ्या नावाखाली काम करायला मिळणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. सध्या इथे कॅज्युअल न्यूज रीडर आणि ट्रान्सलेटर म्हणजेच सामान्य बातम्या वाचक आणि अनुवादक या पदासाठी लोक हवे आहेत. त्याभरती विषयी PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
मराठी जाहिरात येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

या भरतीसाठी पात्र होण्यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असायला हवे. वयाची अट बघितली तर ती सुद्धा बरीच शिथिल आहे. 21 ते 50 वर्षे वयोगटातील कोणीही यासाठी अर्ज करू शकतं. त्यामुळे तरुण मुलांपासून ते अनुभवी लोकांपर्यंत सगळ्यांनाच इथे प्रयत्न करायला पूर्ण वाव आहे. नोकरीचं मुख्य ठिकाण आपलं पुणे असणार आहे.
एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की ही अर्ज प्रक्रिया ऑनलाईन नाही. तुम्हाला तुमचा फॉर्म ऑफलाईन पद्धतीनेच पाठवावा लागेल. तुमचा भरलेला अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग (RNU) आकाशवाणी भवन शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावर वेळेत पोहोचायला हवा. अर्जासोबत थोडी फी सुद्धा भरावी लागते. सामान्य श्रेणीसाठी 354 रुपये आणि एससी एसटी किंवा ओबीसी उमेदवारांसाठी 266 रुपये इतकं हे शुल्क आहे. अर्जाचा नक्की फॉरमॅट काय आहे आणि बाकीच्या अटी समजून घेण्यासाठी फॉर्म पाठवण्याआधी अधिकृत पीडीएफ जाहिरात एकदा नक्की वाचून घ्या.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा