जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत विविध पदांवर भरती; 10वी पास ते पदवीधरांना मोठी संधी | आजचं ऑनलाईन अर्ज करा.

बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची वाट बघणाऱ्यांसाठी खरंच एक मस्त संधी चालून आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने त्यांच्याकडील वेगवेगळ्या रिकाम्या जागा भरण्यासाठी एक नवीन भरती जाहीर केली आहे. बरेचदा बँकेच्या नोकऱ्या फक्त उच्चशिक्षित लोकांसाठी असतात असा आपला समज असतो. पण इथे तसं नाहीये. ही भरती 10वी पास असलेल्या उमेदवारांपासून ते अगदी पदवीधरांपर्यंत सगळ्यांसाठी खुली आहे. त्यामुळे बँकेत काम करण्याची तुमची इच्छा असेल तर ही माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची ठरेल. या भरती प्रक्रियेतून बँकेत बरीच वेगळी पदे भरली जात आहेत. जर तुमचं शिक्षण कमी असेल तर तुम्ही शिपाई या पदासाठी नक्कीच प्रयत्न करू शकता. आणि जर तुम्ही पदवीधर असाल तर असिस्टंट मॅनेजर, लिपिक किंवा सिनिअर ऑफिसरसारख्या महत्त्वाच्या पदांसाठीही तुम्ही अर्ज करू शकता. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

PDF जाहिरात 1येथे क्लीक करा
PDF जाहिरात 2येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा

म्हणजेच तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार इथे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. अर्ज करण्यासाठी वयाची अट अगदी साधी ठेवण्यात आली आहे. उमेदवाराचं वय किमान 18 वर्षे पूर्ण असायला हवं एवढीच काय ती प्राथमिक अट आहे. सगळ्यात सोयीची गोष्ट म्हणजे अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. तुम्हाला फॉर्म भरणं आणि परीक्षेची फी जमा करणं हे सगळं ऑनलाईनच पूर्ण करायचं आहे. फक्त तारखेचा घोळ होऊ देऊ नका कारण अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2026 अशी ठरलेली आहे. शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळायची असेल तर आत्ताच अधिकृत पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून घ्या. या पीडीएफमध्ये आरक्षणाचे नियम, पगार किती असेल, कामाचा अनुभव, परीक्षेची तारीख आणि कॉल लेटर कधी मिळणार याबद्दलची सगळी सविस्तर माहिती दिली आहे. ती एकदा शांतपणे वाचून घ्या आणि मगच तुमचा ऑनलाईन फॉर्म सबमिट करा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा