Maha Food Mumbai Bharti 2026 : वित्तीय सल्लागार व उपसचिव, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई यांच्या अंतर्गत वाहनचालक व शिपाई कर्मचा-यांची भरती करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. भरतीची जाहिरात अन्न व नागरी पुरवठा विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दलची इतर आवश्यक माहिती व pdf जाहिरात खाली दिली आहे.
Maha Food Mumbai Bharti 2026 : Advertisement has been published for the recruitment of drivers and peon employees under the Food and Civil Supplies and Consumer Protection Department, Mumbai. The recruitment advertisement has been published by the Food and Civil Supplies Department.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
◾भरती विभाग : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई अंतर्गत भरती.
◾पदाचे नाव : शिपाई व वाहनचालक.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवारांची शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾वयोमर्यादा : नेमणूक करण्यात येणाऱ्या उमेदवाराचे वय ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे व मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत वय ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) शिपाई :
अ) 10वी उत्तीर्ण.
आ) उमेदवारास मराठी भाषा वाचता व बोलता येणे आवश्यक आहे.
इ) उमेदवार निर्व्यसनी असावा, गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसावा.
2) वाहनचालक :
अ) उमेदवाराजवळ प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) हलके/जड वाहन चालविण्याचा परवाना संकेतस्थळावर ज्या दिनांकास सदर जाहिरात प्रसिध्द करण्यात येईल, त्या दिनांकापासून किमान २ वर्षापूर्वीचा वैध परवाना असणे आवश्यक आहे.
आ) उमेदवारांस शासकीय / निमशासकीय कार्यालयामध्ये नियमित किंवा अनियमित (तदर्थ वा कंत्राटी) वाहनचालक पदावर हलके जड वाहन चालविण्याचा किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
इ) उमेदवारास मराठी भाषा वाचता व बोलता आणि इंग्रजी भाषा वाचता येणे आवश्यक आहे.
◾महत्वाचे : या भरतीसाठी फक्त नोंदणीकृत बाह्ययंत्रणा संस्थांकडून ११ (अकरा) महिन्यांच्या कालावधीसाठी उपलब्ध करुन घेण्यासाठी स्थानिक कंत्राटदाराकडून निवीदा मागविण्यात येत आहेत. उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत.
◾एकूण पदे : 08 जागा भरल्या जात आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई. (Jobs in Mumbai)
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 28 फेब्रुवारी 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : वित्तीय सल्लागार व उपसचिव, ८ वा मजला, गोकुलदास तेजपाल संकुल इमारत, लोकमान्य टिळक मार्ग, मंबई – ४००००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.
