
सरकारी नोकरीची जाहिरात दिसली की आपण सगळेच फॉर्म भरायला पळतो. पण मुंबईच्या अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाची आलेली ही नवीन अपडेट जरा वेगळी आहे. इथे शिपाई आणि वाहनचालक पदांच्या एकूण 8 जागा भरायच्या आहेत. पण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आधीच क्लिअर करतो. या जागांसाठी सर्वसामान्य उमेदवारांना थेट स्वतःहून अर्ज करता येणार नाही. विभागाने ही 11 महिन्यांची कंत्राटी भरती करण्यासाठी थेट स्थानिक मॅनपॉवर पुरवणाऱ्या नोंदणीकृत संस्था आणि कंत्राटदारांकडून निविदा बोलावल्या आहेत. त्यामुळे हा मेसेज वाचून लगेच फॉर्म शोधायला जाऊ नका. PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
एजन्सीमार्फत जे कर्मचारी तिथे रुजू होतील त्यांच्यासाठी काही कडक नियम ठरलेले आहेत. वयाची अट बघितली तर खुल्या गटासाठी 38 आणि राखीव गटासाठी 43 वर्षांपर्यंत वय चालेल. शिपाई पदावर जाणारा माणूस किमान 10 वी पास हवा आणि त्याला मराठी व्यवस्थित बोलता आणि वाचता यायला हवं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला कुठलंही व्यसन नसावं आणि त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसावा. ड्रायव्हरच्या जागेसाठी मात्र नियम थोडे जास्त आहेत. जाहिरात आल्याच्या तारखेपासून किमान 2 वर्षे जुना हलके किंवा जड वाहन चालवण्याचा आरटीओ लायसन्स त्यांच्याकडे असावा. शिवाय कुठल्यातरी सरकारी किंवा निमशासकीय कार्यालयात गाडी चालवण्याचा 2 वर्षांचा अनुभवही मागितलाय. त्यांना मराठीसोबत इंग्रजीही थोडंफार वाचता यायला हवं.
कामाचं मुख्य ठिकाण मुंबई असणार आहे. जे कंत्राटदार या कामासाठी इच्छुक आहेत त्यांनी आपली निविदा 28 फेब्रुवारी 2026 च्या आत दिलेल्या पत्त्यावर पोहोचवणं गरजेचं आहे. अर्ज किंवा निविदा वित्तीय सल्लागार व उपसचिव, 8 वा मजला, गोकुळदास तेजपाल संकुल इमारत, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई 400 001 या पत्त्यावर द्यायची आहे. त्यामुळे तुमच्या ओळखीच्या एखाद्या मॅनपॉवर सप्लाय करणाऱ्या एजन्सीला ही माहिती नक्की सांगा. ही नेहमीची नोकरीची बातमी नसली तरी तुमची एक पोस्ट एखाद्या स्थानिक कंत्राटदाराचा व्यवसाय वाढवायला आणि पर्यायाने 8 जणांना रोजगार मिळवून द्यायला मदत करू शकते.
