महाराष्ट्र शासन : पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय भरती 2026 | MAHA Directorate Of Archaeology & Museums Bharti 2026

MAHA Directorate Of Archaeology & Museums Bharti 2026 : पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, महाराष्ट्र शासन यांचेकडून वर्ल्ड हेरिटेज डेस्क येथे खालील पदांसाठी सेवा घेण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दलची इतर आवश्यक माहिती व PDF जाहिरात खाली दिली आहे.

MAHA Directorate Of Archaeology & Museums Bharti 2026 : Applications are invited from eligible candidates for the following posts at the World Heritage Desk, Directorate of Archaeology and Museums, Government of Maharashtra.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : डेटा एन्ट्री ऑपरेटर, ग्राफिक डिझायनर, प्रकल्प सहाय्यक, ऑटोकॅड ऑपरेटर, वरिष्ठ संवर्धन आर्किटेक्ट, संशोधन सहयोगी, कनिष्ठ संवर्धन आर्किटेक्ट, संशोधन सहाय्यक.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : 26,000 ते 64,000 रुपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत PDF जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज पद्धती : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीनें अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
◾पदाचे नाव व शैक्षणिक पात्रता :
1. वरिष्ठ संवर्धन वास्तुविशारद – 01 पद
शैक्षणिक पात्रता:
अ) संवर्धन वास्तुकला/आर्किटेक्चरल कन्झर्वेशन मध्ये पदव्युत्तर पदवी.
आ) वारसा संवर्धन प्रकल्पांमध्ये किमान 7–10 वर्षांचा अनुभव
इ) DPR तयार करणे, UNESCO नामांकन प्रक्रिया, वारसा नियम यांचा अनुभव प्राधान्याने
2. संशोधन सहयोगी – 02 पदे
शैक्षणिक पात्रता:
अ) इतिहास/पुरातत्त्वशास्त्र/वारसा व्यवस्थापन किंवा संबंधित विषयात पीएच.डी.
आ) किमान 5 वर्षांचा संशोधन अनुभव
इ) दस्तऐवजीकरण आणि अहवाल लेखनाचा अनुभव
3. कनिष्ठ संवर्धन वास्तुविशारद – 01 पद
शैक्षणिक पात्रता:
अ) संवर्धन वास्तुकलेत पदव्युत्तर पदवी
आ) संबंधित क्षेत्रात 2–5 वर्षांचा अनुभव
4. संशोधन सहाय्यक – 03 पदे
शैक्षणिक पात्रता:
अ) पुरातत्त्वशास्त्र/संस्कृती अध्ययन किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
आ) 1–3 वर्षांचा अनुभव आवश्यक
5. डेटा एन्ट्री ऑपरेटर – 02 पदे
शैक्षणिक पात्रता:
अ) पदवीधर व MS-CIT उत्तीर्ण
आ) MS Office व दस्तऐवजीकरणामध्ये प्राविण्य
6. ग्राफिक डिझायनर – 01 पद
शैक्षणिक पात्रता:
अ) ग्राफिक डिझाइनमध्ये पदवी
आ) वारसा दस्तऐवजीकरण लेआउट्सचा अनुभव, GIS/Adobe Suite येणे प्राधान्याने
7. प्रकल्प सहाय्यक – 04 पदे
शैक्षणिक पात्रता:
अ) पुरातत्त्वशास्त्र/संस्कृती अध्ययन किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
आ) 1–3 वर्षांचा अनुभव आवश्यक
8. ऑटोकॅड ऑपरेटर – 01 पद
शैक्षणिक पात्रता:
अ) ऑटोकॅडमध्ये डिप्लोमा/प्रमाणपत्र
आ) किमान 2 वर्षांचा अनुभव
◾एकूण पदे : 015 जागा.
◾नोकरी ठिकाण : मुंबई.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 25 फेब्रुवारी 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, फोर्ट जॉर्ज, सेंट जॉर्ज रुग्णालय आवार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ, मुंबई ४०० ००१
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा