महाराष्ट्र वनविभाग नवीन रिक्त पदासाठी भरती जाहिर! | Maharashtra Vanvibhag Bharti 2026

Maharashtra Vanvibhag Bharti 2026: प्रादेशिक वनवृत्तासाठी रिक्त पदाच्या पदभरतीसाठी नामिकासुची तयार करणे करीता जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्यासाठी अर्हता अनुभव व ईतर पात्रता धारण करणारे इच्छुक उमेदवारांना कडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. वनविभाग मध्ये रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी ही नवीन भरती जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात विभाग प्रमुख तथा, वन संरक्षक (प्रादेशिक) महाराष्ट्र वनविभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Maharashtra Vanvibhag Bharti 2026 : Advertisement has been published for the preparation of a list of names for the vacant posts of Regional Forest Officer. For this, applications are invited from interested candidates possessing qualification, experience and other qualifications in the prescribed format.
🔔 सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

◾भरती विभाग : विभाग प्रमुख तथा, वन संरक्षक (प्रादेशिक) महाराष्ट्र वनविभाग द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : वनविभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.
◾अधिकृत PDF जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

◾अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन (ई- मेल) / ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : 65 वर्ष.
◾पदाचे नाव : विधी सल्लागार.
◾इतर आवश्यक पात्रता :
1) शासकीय सेवेतील ज्यांना विधी विषयक कामकाजाचा अनुभव आहे / सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश, सेवा निवृत्त अतिरिक्त जिल्हा न्यायाधिश तसेच प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांची सेवा तसेच शासकीय सेवेतील (गट-अ ग्रेड) संवर्गीय सेवेमधून सेवानिवृत्त अधिकारी.
2) विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अहर्ता अथवा संबंधित कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
3) करार पध्दतीने नियुक्त करावयाचा सेवा निवृत्त अधिकारी शारीरीक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा.
4) करार पध्दतीने नियुक्त करावयाचा सेवा निवृत्त अधिकारी यांच्याविरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कार्यवाही चालु किंवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी.
◾एकूण पदे : 01 रिक्त पद भरणार आहे.
◾नोकरी ठिकाण : छत्रपती संभाजीनगर.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 05 मार्च 2026 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : उपवनसंरक्षक कार्यालय, वन विभाग (प्रा.), छत्रपती संभाजीनगर.
◾ई- मेल पत्ता : ccftabad@mahaforest.gov.in
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा