जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत थेट मुलाखतीतून नोकरी; शैक्षणिक पात्रता : 10वी ते पदवीधर उत्तीर्ण.

जिल्ह्यात कामाचा अनुभव घेण्याची एक उत्तम संधी चालून आली आहे. येणाऱ्या 2027 च्या जनगणनेचे काम व्यवस्थित पार पाडण्यासाठी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयाने नवीन भरती काढली आहे. या कामासाठी त्यांना टेक्निकल असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ म्हणजे एमटीएस या पदांवर उमेदवारांची गरज आहे. निवड झालेल्या उमेदवारांना थेट तहसील कार्यालय किंवा नगर परिषद कार्यालयांमध्ये काम करण्याची संधी मिळेल. या नोकरीसाठी खूप जास्त शिक्षणाची अट नाही. तुम्ही 10वी किंवा 12वी पास असाल तरीही अर्ज करू शकता आणि जर तुमची पदवी पूर्ण झाली असेल आणि इतर आवश्यक पात्रता असेल तर नक्कीच चांगला फायदा होईल. पगारही चांगला दिला जाणार आहे. तुमच्या पदानुसार तुम्हाला दरमहा 18000 ते 25000 रुपयांपर्यंत मानधन मिळेल. PDF जाहिरात व अधिकृत वेबसाईट खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

स्थानिक पातळीवर सरकारी यंत्रणेसोबत काम करण्यासाठी ही एक समाधानकारक नोकरी ठरू शकते. नक्की कोणत्या पदासाठी काय शिक्षण लागेल हे पाहण्यासाठी जाहिरातीची पीडीएफ एकदा वाचून घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या भरतीसाठी कोणतीही ऑनलाईन फॉर्म भरायची कटकट नाही. तुम्हाला थेट ऑफलाईन पद्धतीने मुलाखतीला जायचे आहे. आज 22 फेब्रुवारी आहे आणि मुलाखत लगेच 24 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. वेळ सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत असेल. मुलाखतीचे ठिकाण वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयामधील राजस्व सभागृह हे आहे. तिथे जाताना तुमचे सगळे मूळ कागदपत्रे त्यांच्या झेरॉक्स प्रती आणि पासपोर्ट साईझ फोटो सोबत न्यायला विसरू नका. वेळ खूप कमी आहे त्यामुळे लगेच तयारीला लागा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा