सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 1540 जागांची मोठी भरती; 80 हजारांपर्यंत पगार, 26 फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज करा.

राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण आणि आयुष विभागात काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्रातल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये नवीन पदे भरली जाणार आहेत. ही भरती थोडीथोडकी नसून तब्बल 1540 जागांसाठी निघाली आहे. राज्य सरकारच्या या नोकरीत तुम्हाला महाराष्ट्रात कुठेही काम करण्याची संधी मिळू शकते. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे यात पगार खूप चांगला आहे. तुमची निवड झाली तर तुम्हाला 80000 रुपयांपर्यंत महिन्याला वेतन मिळू शकतं जे आजच्या काळात खरंच खूप समाधानकारक आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लीक करा

आता या भरतीला नक्की कोणाला अर्ज करता येईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची पदे आहेत आणि त्यामुळे प्रत्येक पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता सुद्धा वेगवेगळीच आहे. त्यामुळे फॉर्म भरायला घेण्याआधी तुम्हाला अधिकृत जाहिरात एकदा नक्की वाचून घ्यावी लागेल. ही भरती पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. म्हणजेच तुम्हाला कुठेही रांगेत उभं राहून फॉर्म द्यायची गरज नाही. घरबसल्या तुम्ही अर्ज भरू शकता आणि फी सुद्धा ऑनलाईनच भरायची आहे. खुल्या वर्गातल्या मुलांसाठी 1000 रुपये तर राखीव गटातल्या लोकांसाठी 900 रुपये फी ठरवली आहे.

फक्त एक काळजी नक्की घ्या ती म्हणजे फी भरण्याआधी तुम्ही त्या पदासाठी पात्र आहात की नाही याची खात्री करून घ्या. कारण एकदा भरलेली फी परत मिळणार नाही. आजची तारीख बघता तुमच्याकडे आता फार वेळ उरलेला नाही. 26 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे आणि रात्री 11.59 पर्यंतच लिंक चालू राहील. त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न बघता जाहिरात वाचून घ्या आणि लगेच फॉर्म भरा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा