पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागात रिक्त जागांची भरती; आजचं अर्ज करा.

मित्रांनो राज्याच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागात एक महत्त्वाची भरती निघाली आहे. नवी मुंबईतल्या बेलापूरला जे राज्य पाणी आणि स्वच्छता मिशनचे कार्यालय आहे तिथून जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशनची खूप मोठी कामे सध्या चालतात. याच कामांसाठी आता त्यांना नव्या लोकांची गरज आहे. पण एक गोष्ट इथे आधीच स्पष्ट करतो की ही भरती फ्रेशर्ससाठी नसून जे लोक आधीपासून संबंधित संवर्गात अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करत आहेत फक्त त्यांच्याकडूनच अर्ज मागवले जात आहेत. त्यामुळे तुम्ही जर आधीच या क्षेत्रात नोकरी करत असाल तर ही तुमच्यासाठी एक खूप मोठी संधी असू शकते. PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा

इथे एकूण 22 जागा भरायच्या आहेत आणि या नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रभर कुठेही असू शकते. पदांचा विचार केला तर यात प्रकल्प व्यवस्थापक उप व्यवस्थापक भूजल तज्ञ स्वच्छता आणि आरोग्य सल्लागार उप अभियंता शाखा अभियंता उपलेखापाल सहाय्यक लिपीक आणि अगदी शिपाई अशी अनेक पदे आहेत. अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत पीडीएफ जाहिरात नीट वाचून घ्या. भरती प्रक्रियेत तुमचा कोणताही गैरसमज झाला किंवा काही आर्थिक नुकसान झाले तर त्याची जबाबदारी आमची असणार नाही अशी स्पष्ट सूचना आधीच दिलेली आहे.

आता फॉर्म कसा भरायचा ते बघूया. ही प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन आहे. तुम्हाला तुमचा अर्ज राज्य पाणी व स्वच्छता मिशन पहिला मजला सिडको भवन बेलापूर नवी मुंबई 400614 या पत्त्यावर पाठवायचा आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2026 आहे. तसा वेळ भरपूर आहे पण फॉर्म पाठवायचा असल्याने तो वेळेत मिळेल याची काळजी तुम्हाला घ्यावीच लागेल. म्हणून जाहिरात वाचा आणि लवकर अर्ज पाठवून द्या.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप चॅनेल Follow करा ➤ MN Nokari Logo
सर्वात आधी नोकरी जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा.
येथे क्लीक करा