
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
12वी उत्तीर्ण आहात? आधार केंद्र पाहिजे? तर ही चांगली संधी आहे. माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय, मुंबई यांचे कडून जळगाव जिल्ह्यास आधार संच प्राप्त झाले आहेत. ज्या महसुल मंडळात सद्यस्थिती मध्ये आधार केंद्र नाही अशा ठिकाणी आधार केंद्र सुरु करण्याचे निर्देश शासनाकडून प्राप्त आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळांमध्ये आधार संच वितरण करण्यात येणार आहे. आपले सरकार केंद्र चालकांनी पात्रतेचे निकष, रिक्त महसुल मंडळाचे नावे व आवश्यक माहिती वरती दिलेल्या अधिकृत जाहिरात मधून माहिती करून घ्यावी. इच्छुक आपले सरकार केंद्र चालकांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे दिनांक 02 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाईन सादर करावेत.
जळगाव जिल्ह्यातील रिक्त महसूल मंडळांमध्ये आधार केंद्रासाठी मान्यता देण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत, या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्र चालकांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. यापूर्वी आधार केंद्र मिळणेबाबत या कार्यालयात प्राप्त अर्ज या जाहिरातीप्रमाणे निकषात बसत नसल्यास, अपात्र करण्यांत येतील. तसेच यापूर्वी प्राप्त अर्ज या जाहिराती प्रमाणे रिक्त असणा-या महसुल मंडळाकरीता नसल्यास अर्ज अपात्र करण्यांत येईल. मात्र असे अपात्र झालेले अर्जदार वरील नमूद लिंक वर नव्याने अर्ज करु शकतील. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.