जिल्हा परिषद अंतर्गत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना भरती 2025 | Aapla Dawakhana Bharti 2025

Aapla Dawakhana Bharti 2025 : हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्टाफ नर्स, बहुउददेशिय आरोग्य सेवक (MPW) व इतर रिक्त पदे भरावयाची आहेत. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 12वी व इतर पात्र उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आपला दवाखाना मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. अधिकृत जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Aapla Dawakhana Bharti 2025 : Hindu Hriday Samrat Balasaheb Thackeray Apna Hospital is looking to fill the vacant posts of Medical Officer, Staff Nurse, Multipurpose Health Worker (MPW). Applications are invited from interested candidates who fulfill the following eligibility criteria.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या द्वारे मान्यता दिल्या नंतर जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
भरती प्रकार : आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : स्टाफ नर्स, बहुउददेशिय आरोग्य सेवक (MPW) व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 12वी व इतर पात्रता. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : निवड करण्यात आल्यावर उमेदवारांना 18,000 ते 60,000 रूपये मानधन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 43 वर्ष पर्यंत.
अर्ज शुल्क :
▪️खुल्या प्रवर्गातील : १५०/- रुपये.
▪️राखीव प्रवर्गातील : १००/- रुपये.
भरती कालावधी : ही रिक्त पदे निव्वळ कंत्राटी स्वरुपातील आहेत.
पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️वैद्यकिय अधिकारी : MBBS
▪️स्टाफ नर्स : GNM
▪️बहुउददेशिय आरोग्य सेवक (MPW) : विज्ञान शाखेत १२ वी उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
एकूण पदे : 030 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : बुलढाणा. (Jobs in Buldhana)
◾जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमीत पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपातील पदे आहेत. सदर पदावर कायम पणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागू नाही. तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून घेणे किंवा शासना मार्फत सेवा संरक्षण किंवा त्या संबंधी दावा करण्याचा अधिकार राहणार नाही.
◾अर्जदार हा संबंधीत पदासाठी शारिरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द कोणताही फीजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
◾उपरोक्त कंत्राटी पदाकरिता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल.
◾कामाचा अनुभव हा शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्थांचा ग्राहय धरण्यात बेईल. तसेच ज्या उमेदवारांनी Covid-19 मध्ये काम केले आहे अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल, याकरीता त्यांच्याकडे Covid 19 मध्ये काम केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील.
◾जाहिरातीस अनुसरुन ज्या उमेदवारांचे अर्ज विहित मुदतीत प्राप्त होतील. केवळ अशाच उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जातील. अन्य कोणत्याही संदर्भातील यापूर्वी या कार्यालयास प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
◾जाहिराती मधील रिक्त पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो तसेच रिक्त ठिकाणांमध्ये बदल होऊ शकतो, याबाबतचे सर्व अधिकार अध्यक्ष निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. बुलडाणा यांनी राखून ठेवले आहेत.
◾एका पेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करावयाचा असल्यास उमेदवारांनी प्रत्येक पदा करिता स्वतंत्र अर्ज सादर करावेत.
◾निवड प्रक्रियेतील पात्र/अपात्र उमेदवारांची यादी तसेच निवड यादी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाच्या नोटीसबोर्डवर किंवा बुलडाणा जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात बेईल. या बाबत कुठलाही स्वतंत्र पत्र व्यवहार उमेदवारांसोबत केला जाणार नाही.
◾निवड यादीतील गुणानुक्रमानुसार प्राधान्यक्रमाने पदस्थापना केली जाईल. त्या बाबत उमेदवाराने कुठल्याही दबाव तंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द करण्यात येईल.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 6 मार्च 2025 ही अर्ज मागविण्याची अंतिम दिनांक आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, बुलडाणा.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇

error: Content is protected !!