
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
अटी व शर्ती | येथे क्लीक करा |
भरती होणाऱ्या गावांची यादी | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
आपले सरकार सेवा केंद्र मिळविण्याच्या प्रयत्नात असाल तर ही उत्तम संधी आहे. सातारा जिल्हयातील आपले सरकार सेवा केंद्र चालविणेसाठी इच्छुक असलेल्या ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या भौगोलिक क्षेत्रातील CSC-SPV कडे ऑनलाईन नोंदणीकृत CSC केंद्राचालकांना आणि CSC-SPV चे केंद्र मिळवण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असलेल्या अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये तब्बल 1152 केंद्रे दिली जात आहेत.
आपले सरकार सेवा केंद्राची संख्या कमी असलेल्या ग्राम पंचायती व नागरी क्षेत्राची यादी, आपले सरकार सेवा केंद्र अर्ज मागविणेकामी देणेच्या अटी व शर्ती, आपले सरकार सेवा केंद्र मागणी अर्जाचा नमुना इ. वरती दिलेल्या आहेत. तसेच सातारा जिल्हयाचे https://www.satara.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व तहसिल कार्यालयाचे नोटीस बोर्डवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तरी आपले सरकार सेवा केंद्र चालविणेसाठी इच्छुक असलेल्या ग्रामपंचायत व नगरपंचायतीच्या भौगोलिक क्षेत्रातील CSC-SPV कडे ऑनलाईन नोंदणीकृत CSC केंद्राचालकांनी आणि CSC-SPV चे केंद्र मिळवण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करत असलेल्या व्यक्तींनी सदर अर्ज अचूक व परिपूर्ण भरून सोबतच्या अटी शर्तीस अधीन राहून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.