Aaple Sarkar Seva Kendra 2024 : आपले सरकार सेवा केंद्र जाहीरनामा 2024 : माहिती व तंत्रज्ञान विभाग (साप्रवि), मंत्रालय, मुंबई यांचेकडील शासन निर्णय नुसार CSC केंद्रधारकांना आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा देणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार CSC केंद्रधारकांना व त्या भौगोलिक क्षेत्रात राहणारा कोणताही व्यक्ती ज्यांचे केंद्र सुरू नसेल परंतू जो केंद्र मिळण्यासाठी विहित केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करीत असेल अशा व्यवतींना सूचित करणेत येते की, सदरचा जाहिरनामा, अर्जाचा विहित नमूना, अटी व शर्तीबाबतची माहिती तसेच शहरी / ग्रामीण भागाकरीता रिक्त ठिकाणांची यादी व जाहिरात खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी खालील अर्जाचा विहित नमुना डाउनलोड करून त्यावरील परिपूर्ण माहिती भरुन खालील नमूद तारखेपर्यंत अर्ज सादर करावेत. पुर्ण PDF जाहीरनामा, रिक्त ठिकाणची यादी व अर्ज खाली दिला आहे.
◾पदाचे नाव : आपले सरकार सेवा केंद्र चालक.
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान 10 वी परीक्षा (बोर्ड परीक्षा) उर्तीण असणे आवश्यक आहे.
◾वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे.
◾आपले सरकार सेवा केंद्राबाबतच्या अटी व शर्ती :
1) उमेदवारांनी रहिवाशी पत्त्याचा पुरावा किमान दोन पुरावे जोडणे आवश्यक आहे.
2) उमेदवारांनी आधार कार्ड व पॅनकार्ड सादर करणे बंधनकारक आहे.
3) उमेदवारांनी अर्जामध्ये पत्ता, ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक स्वतःच नमूद करणे बंधनकारक आहे.
4) उमेदवार हा गुन्हेगार पार्श्वभूमीचा नसावा. अशी बाब निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर उमेदवारास अपात्र करणेत येईल.
◾पुर्ण जाहीरनामा, अर्ज खाली दिला आहे.
पुर्ण जाहिरनामा | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : 12 ऑगस्ट 2024 पासून अर्ज स्वीकारणे सुरू होइल.
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : उपरोक्त आपले सरकार सेवा केंद्रांकरिता अर्ज सेतू संकलन, महसूल शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, शासकीय दूध डेअरीजवळ, सात रस्ता परिसर सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत मूळ अर्ज व प्रमाणपत्रांच्या स्वसाक्षांकित प्रती दिनांक 30 ऑगस्ट 2024 सायं 5.00 वाजेपर्यंत समक्ष सादर करावेत. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार कोणत्याही परिस्थितीत केला जाणार नाही.
◾उमेदवार हा सोलापूर जिल्हा / शहर आपले सरकार सेवा केंद्राच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये (महानगरपालिका / नगरपालिका / ग्रामपंचायत) स्थानिक रहिवाशी असणे बंधनकारक आहे.
◾आवश्यक कागदपत्रे :
▪️ किमान 10 वी परीक्षा (बोर्ड परीक्षा) उत्र्तीण प्रमाणपत्र (झेरॉक्स)
▪️ Ms-CIT/CCC प्रमाणपत्र (झेरॉक्स)
▪️आधारकार्ड आणि पॅनकार्ड (झेरॉक्स)
▪️CSC प्रमाणपत्र / इतर नागरी सुविधा केंद्र प्रमाणपत्र (असल्यास)
▪️स्वंयघोषणापत्र
▪️रहिवाशी पुरावा
▪️ व इतर (मूळ जाहीरनामा पहा.)