Aarogy Vibhag Bharti 2024 : युनिसेफ अर्थसहाय्यित मातृत्व मानसिक आरोग्य प्रकल्प, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अंतर्गत मंजूर असलेल्या पदभरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडुन विहीत नमुन्यात विहीत मुदतीत अर्ज आमंत्रित करण्यात येत आहे. तरी उत्सुक्त उमेदवारांनी लवकरात लवकर आपले ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आरोग्य विभाग नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी. भरतीची जाहिरात युनिसेफ अर्थसहाय्यित मातृत्व मानसिक आरोग्य प्रकल्प, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Aarogy Vibhag Bharti 2024 : Applications are invited from interested and eligible candidates in the prescribed format within the prescribed period for the recruitment process approved under the UNICEF-funded Maternal Mental Health Project, Health and Family Welfare Training Center.
◾भरती विभाग : मातृत्व मानसिक आरोग्य प्रकल्प, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभाग मध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : खाली दिलेली pdf जाहिरात पहा.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात pdf वाचावी.)
◾मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 35,000 ते 70,000 रूपये वेतन दिले जाणार आहे.
◾पूर्ण pdf जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन / ऑनलाइन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾निवड प्रक्रिया : मुलाखत व्दारे निवड केली जाणार आहे.
◾वयोमर्यादा : 18 ते 45 वर्ष.
◾भरती कालावधी : रिक्त पदे निव्वळ कंत्राटी स्वरुपात भरण्यात येणार आहेत.
◾पदाचे नाव व इतर पात्रता :
▪️प्रकल्प समन्वयक :
1] वैद्यकीय क्षेतील पदवी (MBBS/BAMS/BHMS) व MPH.
2] MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️तालुका समन्वयक : 1] MSW
2] MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾रिक्त पदे : 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सिन्नर व सुरगाणा, जिल्हा नाशिक.
◾पदासमोर नमुद मानधन हे एकत्रित मासिक मानधत असुन त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही भत्ते देय राहणार नाही. तसेच शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र उमेदवारां पैकी सुरगाणा व सिन्नर तालुक्यातील स्थानिक उमेदवारास प्राधान्य राहील.
◾वरील पद एकत्रित मानधनाची असून, त्यांचा कालावधी ०६ महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. त्या आधी मंजुरी न मिळाल्यास पदे कधीही समाप्त करण्यात येतील.
◾वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत.
◾बुनिसेफ कडुन सदर पदांना मान्यता न मिळाल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पुर्वसुचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
◾अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्टया सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
◾अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलून मिळण्याची मागणी करता येणार नाही.
◾अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
◾भरती प्रक्रिये दरम्यान मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरीता कोणतेही मानधन अथवा प्रवास गार्च देय राहणार नाही.
◾अर्जाचा नमुना हा जाहिरातीसोबत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास, उमेदवारांचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
◾उमेदवारांचा अर्ज अपूर्ण व अर्धवट भरलेला असल्याने तसेच आवश्यकतेनुसार कागदपत्रे जोडले नसल्यास नाकारला गेल्यास सर्वस्वी जबाबदारी ही उमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही.
◾विहीत नमुन्यातील अर्जासोबत : १) ई-मेल आयडी, बयाचा पुरावा.
२) पदवी / पदविकार शेवटच्या वर्षाची प्रमाणपत्र (टिपः सर्व वर्षांचे प्रमाणपत्र सादर करु नये)
३) गुणपत्रिका
४) शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र एवढीच कागदपत्रांच्या छायांकित प्रती साक्षांकित करुन जोडण्यात याव्यात व तसेच पडताळणीसाठी मुळ कागदपत्रे सोबत ठेवावीत.
◾पात्र उमेदवारास मुलाखतीचा दिनांक व वेळ दुरध्वनी व ईमेल द्वारे कळविण्यात येईल.
◾निवड झालेल्या उमेदवारांना अटी व शर्ती मान्य असल्याबाबत रु.१००/- बॉन्ड पेपरवर करारनामा
◾निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्यापासून ७ दिवसांमध्ये नियुक्तीचे ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश संपुष्टात आणून, प्रतिक्षाधिन यादीतील पुढील उमेदवारांस नियुक्ती देण्यात येईल.
◾भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार, पदे कमी-जास्त करणे, भरती प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे, पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करणे निवड प्रकियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार, इत्यादी प्रकारचे सर्व अधिकार हे प्राचार्य, आरोग्य व कुटूंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांनी राखुन ठेवलेले आहेत.
◾शेवटची दिनांक : 09 डिसेंबर 2024 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, नाशिक, जिल्हा रुग्णालय आवार.
◾ई- मेल पत्ता : hfwtcunicef@gmail.com
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.