आरोग्य सेविका भरती 2025 | मासिक वेतन : 18,000 रूपये | Aarogya Sevika Bharti 2025

Aarogya Sevika Bharti 2025 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग महानगरपालिका यांचे नियंत्रणाखालील एकात्मिक आरोग्य व कुटंब कल्याण सोसायटी अंतर्गत आरोग्यसेविका हि पदे भरण्याकरीता पात्र उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी खालील नमुद पात्रता निकष पूर्ण करणा-या, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरती बद्दलची आवश्यक माहिती, सविस्तर pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Aarogya Sevika Bharti 2025 : Eligible candidates will be selected for filling the posts of Health Workers under the Integrated Health and Family Welfare Society under the control of the Health Department, Municipal Corporation under the National Urban Health Mission. For this, applications are invited from interested and eligible candidates who fulfill the following eligibility criteria.
⚠️ महत्वाचे : या लेखात दिलेली माहिती अपूर्ण असू शकते. अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NHM) द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आरोग्य विभाग अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : आरोग्य सेविका.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत PDF जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन / वेतन : 18,000 रूपये मासिक मानधन दिले जाणार आहे.
◾उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्षे वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : सदरील पदे हि निव्वळ कंत्राटी पद्धतीने केवळ प्रकल्प कालावधी पुरते भरावयाचे असून प्रकल्प बंद होताच सदर पदे आपोआप संपुष्टात येतील.
आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता : ANM कोर्स पास, MMC नोंदणी आवश्यक.
एकूण पदे : 026 जागा.
अर्ज शुल्क :
▪️प्रवर्गातील उमेदवारांनी – १००/- रू .
▪️खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी – १५०/- रू.
नोकरी ठिकाण : राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर. (Jobs in Nagpur)
◾सदर पदांकरीता शासन निर्णयानुसार प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येणार नाही.
◾मेरीट लिस्टनुसार व अनुभवाच्या आधारे उमेदवारांची निवड करण्यात येईल.
◾सदरील पदे हि राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत निव्वळ कंत्राटी स्वरुपाची राहतील. त्यांचा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसलाही संबंध राहणार नाही.
◾वरील सर्व पदे ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असल्याने त्यास नागरी सेवा नियम लागू होणार नाही.
◾एकुण पदांच्या संख्येत अथवा आरक्षणामध्ये बदल होऊ शकतो.
◾सदरील पदे हि निव्वळ कंत्राटी पद्धतीने केवळ प्रकल्प कालावधी पुरते भरावयाचे असून प्रकल्प बंद होताच सदर पदे आपोआप संपुष्टात येतील.
अर्जासोबत जोडावयाची शैक्षणिक कागदपत्रे :- 1] नुकताच काढलेला पासपोर्ट साईझ फोटो-१ व स्वतःचा ई-मेल व दुरध्वनी क्रमांक
2] अर्जदार महाराष्ट्र राज्याचा राहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
3] प्रवर्गामध्ये अर्ज करीत असल्यास जात प्रमाणपत्र
4] जन्म तारखेचे प्रमाणपत्र (शाळा/महाविद्यालय सोडण्याचे प्रमाणपत्र/जन्माचे प्रमाणपत्र)
5] ओळखपत्र-आधार कार्ड/मतदान कार्ड/ड्रायव्हिंग लायसंस
6] पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अर्हतेची अंतिम वर्षाची गुणपत्रीका व पदानुसार शासनातर्फे प्राप्त रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र व नूतनीकरण
7] पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अर्हतेशिवाय प्राप्त पदव्युत्तर पदवी (PG Degree) आणि पदव्युत्तर पदवीका (PG Diploma) प्रमाणपत्र
◾उच्च शैक्षणिक अर्हता धारकांस व अनुभव असलेल्या उमेदवारांस प्राधान्य दिले जाईल.
◾उमेदवारांनी अर्ज करीत असलेलया पदाचे नाव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरीता नमुद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग) अर्जामध्ये स्पष्टपणे नमुद करावा.
◾कोणत्याही वेळेस भरती अथवा निवड प्रक्रिया रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार निवड समिती एन.यु.एच.एम. म.न. पा. नागपूर यांना राहतील त्यावर कोणतीही हरकत / आक्षेप घेता येणार नाही.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 08 जानेवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर-४४०००१.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.


error: Content is protected !!