अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
आदिवासी विकास विभाग, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, जि. अमरावती अंतर्गत नवीन पद भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या कार्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या प्रशासकीय विकासात्यक योजना, सेवा विषयक सेवानिवृत्ती प्रकरणे आणि महसुल विषयक आणि इतर बाबींचे असणारे वाद याबाबत कायदेशीर अभिलेख मुसदा तयार करणे, त्याअनुषंगाने असलेल्या अभिलेख्यांची पूर्तता करण्याविषयी मार्गदर्शन करणे कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यासाठी पाठपुरावा करणे तसेच या कार्यालयाच्या अंतर्गत असणाऱ्या शासकीय वादाच्या निराकरणासाठी कायदेशीर बाबींची पुर्तता करणे, ज्या-ज्या ठिकाणी न्यायालयीन प्रक्रिया उपस्थित होतील त्या-त्या ठिकाणी या कार्यालयाचे विधी सल्लागार म्हणून प्रतिनिधीत्व करण्याकरिता उपस्थित राहुन न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करणे.
या कामी सहाय्यक जिल्हाधिकारी, तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी, जि. अमरावती हे या कार्यालयामार्फत संनियंत्रण व मुल्यमापन या योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या कॅलेंडर वर्षामध्ये किमान ११ महिन्यांकरिता किंवा गरजेनुसार (माहवार पध्दतीने) मानधन तत्वावर अत्यंत तात्पुरत्या स्वरुपात “विधी तज्ञ तथा सल्लागार” या पदाकरिता विहित अर्हता धारकाच्या नियुक्ती करिता मुलाखती घेण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात पहा.