
Pdf जाहिरात 1 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज 2 | येथे क्लीक करा |
Pdf जाहिरात 2 | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज 2 | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
नोकरी शोधताय? विभागीय आयुक्त, विभाग अंतर्गत शहर समन्वयक पदासाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. पुणे विभागातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये शहर समन्वयक (कंत्राटी) पदाच्या ७४ + ६४ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही एक सुवर्णसंधी असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. ४५,०००/- रुपये मासिक मानधनासह या पदावर काम करण्याची संधी मिळणार आहे. नोकरीचे ठिकाण पुणे विभागातील विविध नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये असेल. त्यामुळे स्थानिक विकासात सक्रिय योगदान देण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
◾शैक्षणिक पात्रता:
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे बी.ई./बी.टेक. (कोणतीही शाखा), बी. आर्क., बी. प्लॅनिंग. किंवा बी.एस.सी. (कोणतीही शाखा) ही पदवी असणे आवश्यक आहे.
◾वयोमर्यादा:
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३५ वर्षांपर्यंत असावे.
◾महत्त्वाच्या तारखा:
1) ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: ०२ जुलै २०२५
2) ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०८ जुलै २०२५
या भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी विभागीय आयुक्त, विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्या. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पाहूनच अर्ज करावा.