
आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागामध्ये गट-क आणि गट-ड मधील विविध पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 186 रिक्त पदे भरण्यात येणार असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. अग्निशमन दलात काम करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली पहा.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज (ऑनलाईन अर्ज दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून चालू होतील.) | येथे क्लीक करा |
या भरतीत चालक–यंत्रचालक (अग्निशमन) आणि फायरमन (अग्निशामक) ही दोन पदे भरण्यात येणार आहेत. दोन्ही पदांसाठी उमेदवाराने माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. तसेच राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, मुंबई यांचा 6 महिन्यांचा अग्निशामक प्रशिक्षण कोर्स पूर्ण केलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. चालक पदासाठी वैध जडवाहन परवाना व किमान 3 वर्षांचा वाहनचालक अनुभव आवश्यक आहे.
उमेदवार मराठी भाषेत वाचन, लेखन आणि बोलण्यात निपुण असावा. शारीरिक पात्रतेसाठी पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी., छाती 81 से.मी. (5 से.मी. फुगवता येणारी) व वजन किमान 50 किलो असावे, तर महिला उमेदवारांसाठी उंची 157 से.मी. आणि वजन 46 किलो अपेक्षित आहे. दोघांची दृष्टी चांगली असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा 18 ते 28 वर्षे असून मागासवर्गीय उमेदवारांसाठी ती 38 वर्षांपर्यंत शिथिल आहे. अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये निश्चित करण्यात आले आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 19,000 ते 63,200 रुपये मासिक वेतन दिले जाईल. भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नाशिक शहर असेल. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज वेळेत सादर करून अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.