महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2025 | पात्रता – 12वी उत्तीर्ण | सर्व जिल्हा जाहिराती येथे उपलब्ध | Anganwadi Bharti 2025 Maharashtra

Anganwadi Bharti 2025 Maharashtra : एकात्मिक बाल विकास सेवा योजना, हया केंद्रपुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या द्वारे रिक्त असलेली अंगणवाडी मदतनीस यांची मानधनी पदे भरण्यासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागणी करण्यात येत आहे. भरतीची अधिकृत जाहिरात बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. 12वी उत्तीर्ण उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. रिक्त असणारी पदे, भरली बद्दलची आवश्यक माहिती, pdf सविस्तर जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Anganwadi Bharti 2025 Maharashtra : Applications are invited from eligible candidates to fill the honorary posts of Anganwadi Helpers vacant by Child Development Project Officer under the Integrated Child Development Services Scheme, a centrally sponsored scheme.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : महिला व बालविकास विभाग अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन – महिला व बालविकास विभाग) ने परवानगी दिल्या नंतर ही भरती होत आहे.
पदाचे नाव : अंगणवाडी सेविका व मदतनीस.
शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾अधिकृत जाहिराती, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातीयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 35 वर्षे (विधवा महिला कमाल 40 वर्ष).
अर्ज सुरू : फेब्रुवारी 2025 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾ज्या नगर परिषद / नगर पंचायत / नगर पालिका / नगरपरिषद / ग्रामपंचायत क्षेत्रात अंगणवाडी मदतनीस पद रिक्त आहे. त्या नगरपरिषद/ नगरपंचायत / नगरपालिका / ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील रहीवासी असलेल्या उमेदवारांना पात्र समजण्यात येईल. स्थानिक रहिवाशी असले बाबत शासनाने निश्चित केलेला पुरावा सोबत जोडने आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया : उमेदवाराच्या शैक्षणिक गुण पत्रिकेमध्ये मिळालेल्या गुणाच्या आधारे 80 गुण (१२ वी, पदवीधर, पदव्युत्तर, डी एड, बी एड व शासकिय मान्यता संस्थेचे संगणक परिक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT) अथवा शासनाने वेळोवेळी समकक्ष ठरवीलेला संगणक अभ्यासक्रम पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र यांचे एकत्रीत कमाल 80 गुण) व अतिरिक्त 20 गुण ( विधवा/अनाथ -10 गुण, अनुसुचित जाती जमाती-05 गुण, इतर मागास प्रवर्ग/विमुक्त जाती /भटक्या जमाती /आर्थिक दृष्ट्या दुर्बल / विशेष मागास प्रवर्ग / सामाजिक व शैक्षणीक दृष्या मागास प्रवर्ग 03 गुण, अंगणवाडी सेविका / मिनी सेविका । मदतनिस पदाचा 02 वर्षाचा अनुभव असल्यास – 05 गुण.

महत्वाच्या अटी व शर्ती :
1) शैक्षणिक पात्रता : अंगणवाडी सेविका आणि मदतनिस पदासाठी इयत्ता १२ वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. (अंगणवाडी भरती 2025 महाराष्ट्र)
2) वास्तव्याची (स्थानिक रहिवाशी असणे) अट उमेदवार महिला स्थानिक रहिवाशी असावी, स्थानिक रहिवाशी म्हणजेच ज्या शहरातील अंगणवाडी मदतनिस पदासाठी अर्ज केलेला असेल त्याच शहरातील (नगरपालिका /नगरपरिषद / नगरपंचायत क्षेत्रातील) रहिवाशी असणे आवश्यक आहे. यासाठी रहिवाशी दाखला म्हणुन शासकिय दस्तऐवज (जसे: आधारकार्ड / मतदान ओळखपत्र तहसिलदार/वार्ड अधिकारी यांचा रहीवाशी दाखला इ.) जोडणे आवश्यक आहे. (अंगणवाडी भरती 2025 महाराष्ट्र)
3) वयाची अट व पुरावा अंगणवाडी सेविका, मदतनिस या पदासाठी वयोमर्यादा किमान १८ वर्षे व कमाल ३५ वर्षे राहिल. तथापि विधवा उमेदवारासाठी कमाल वयोमर्यादा ४० वर्षे राहिल. वयाचा पुरवा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला / १० वी उत्तीर्ण बोर्डाचे प्रमाणपत्र जन्म नोंद दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक राहील, उमेदवाराचे किमान व कमाल वय हे जाहिरात प्रसिध्दीच्या दिनांकास गणण्यात येईल. (Anganwadi Bharti 2025 Maharashtra)

4) लहान कुटुंब :- लहान कुटुंबाकरीता दि.२७/०२/२०२४ चा शासन निर्णय लागू राहील वरील पदासाठी अर्ज करणा-या उमेदवारांस लहान कुटुंबाची अट लागु राहिल. उमेदवारांस दोन पेक्षा जास्त हयात अपत्ये (दत्तक दिलेल्या अपत्यांसह) नसावीत. अर्जासोबत दिलेल्या नमुन्यात लहान कुटुंबा बाबतचे प्रतिज्ञापत्र जोडणे आवश्यक राहिल. अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येईल,
5) मराठी भाषेचे ज्ञान मदतनिस रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांस मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. उमेदवाराने नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेपैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक राहील.
6) उमेदवार विधवा असल्यास पतीचे मृत्यु नोंदणी प्रमाणपत्र जोडावे. (अंगणवाडी भरती 2025 महाराष्ट्र)

7) उमेदवार अनाथ असल्यास जोडावे. संबंधित विभागीय उप-आयुक्त, महिला व बाल विकास विभाग यांचे कडील प्रमाणपत्र. (Anganwadi Bharti 2025 Maharashtra)
8) मागासवर्गीय असल्यास अनुसुचित जाती/ अनुसुचित जमाती/ इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती / भटक्या जमाती आर्थिक दृष्टया दुर्बल घटका विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिक दृष्टया मागास वर्ग असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
9) अनुभव : उमेदवारास शासन यंत्रणेतील अंगणवाडी मदतनिस म्हणुन कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असल्याशिवाय अनुभवासाठी असलेले गुण देण्यात येणार नाहीत. असा अनुभव उमेदवारांस असल्यास त्याबाबतचे सक्षम अधिका-याचे अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. मान्यता प्राप्त खाजगी व स्वयंसेवी, अनुदानित /विना अनुदानित संस्थेतील कामाचा अनुभव ग्राहय धरला जाणार नाही व याबाबतचा कोणताही युक्तिवाद उमेदवाराने केल्यास अपात्र ठरविण्यात येईल. (Anganwadi Bharti 2025 Maharashtra)

10) उमेदवाराने अर्जामध्ये नगरपालिका नगरपचायत / नगरपरिषद असलेल्या शहराचे नांवाचा उल्लेख करावा.
11) एका उमेदवाराने एका पदासाठी एकच अर्ज सादर करावा. उमेदवाराने एका पदासाठी वेगवेगळे अर्ज सादर केल्यास एकच अर्ज विचारात घेण्यात येईल व त्याबाबत उमेदवाराशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही.
12) शहराचे नांव, अंगणवाडी ठिकाणाचे नाव व पदाचे नांव नमुद केलेले नसणे, अर्ज अपुर्ण भरलेला असणे, खाडाखोड असणे, उमेदवाराची विहित ठिकाणी स्वाक्षरी नसणे तसेच अर्जाच्या सोबत आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या छायांकित व साक्षांकित प्रती नसणे इ. कारणांमुळे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील व त्यासंबंधी उमेदवारांस कळविण्यात येणार नाही. (अंगणवाडी भरती 2025 महाराष्ट्र)
13) अंतिम दिनांकानंतर (दि. १८.२.२०२५ नंतर) आलेल्या किंवा डाकेने (पोष्टामुळे) विलंब झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. (Anganwadi Bharti 2025 Maharashtra)

14) निवड कार्यपध्दती : उमेदवारांनी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांवरुन इयत्ता १२वी / पदवीधर / पदव्युत्तर / डिएड / बीएड संगणक परिक्षा / विधवा / अनाथ अनुसुचित जाती / अनुसुचित जमाती इतर मागास प्रवर्ग / विमुक्त जाती भटक्या जमाती आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास प्रवर्ग सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्ग अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी २ वर्षांचा अनुभव या बार्बोच्या आधारे गुण दिले जाणार आहे. उमेदवारास मिळालेल्या एकुण गुणांनुसार गुणानुक्रमाने पात्र उमेदवारांची शहरातील रिक्त पदांच्या संख्येनुसार निवड करण्यात येईल. या पदांकरीता लेखी परिक्षा अथवा मुलाखत घेतली जाणार नाही. अर्जा सोबत जोडलेल्या प्रमाणपत्रांनुसार शासन निर्णयात नमुद केल्याप्रमाणे उमेदवारांना गुण देऊन प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल, त्यावर अर्ज करणा-या उमेदवारांना आक्षेप /तक्रार असल्यास अर्ज केलेल्या उमेदवारांनी १० दिवसांचे आंत लेखी तक्रार बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि. नाशिक कार्यालयाकडे सादर करावी. सदर तक्रारींची शहानिशा करुन अंतिम गुणवत्ता यादी प्रसिध्द करण्यात येईल, निवड प्रकियाचे वेळापत्रक यासोबत देण्यात आले आहे. (Anganwadi Bharti 2025 Maharashtra)

15) निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने अर्जात / किंवा अर्जासोबत दिलेली माहिती अगर कागदपत्रे खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवुन ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्या उमेदवाराची उमेदवारी/नियुक्ती सदर प्रक्रियेच्या कोणत्याही टण्यावर किंवा निवड झाल्यानंतरही रह करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांच्या नियुक्ती वेळी मुळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहिल, अन्यथा निवड प्रक्रियेतुन अपात्र ठरविण्यात येईल.
16) एखादया उमेदवाराने त्याच्या निवडीसाठी प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष दबाव आणल्यास त्यांस निवड प्रक्रियेतुन बाद करण्यात येईल. (अंगणवाडी भरती 2025 महाराष्ट्र)
17) अंगणवाडी सेविका मदतनिस यांना शासकिय नियमानुसार एकत्रित मानधन देय राहील, शासनाने वेळोवळी करण्यात आलेली वाढ नियमानुसार अनुज्ञेय राहिल. मात्र मानधना व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचे भत्ते सवलती अनुज्ञेय नाही. अंगणवाडी सेविका / मदतनीस हे एकत्रित मानधनावरील कायम मानधनी स्वरुपाचे पद आहे. (Anganwadi Bharti 2025 Maharashtra)

18) संबंधित शहरातील अंतिम निवड यादी जाहिर झाल्यानंतर गुणानुक्रमे सेविका मदतनिस यांची निवड करण्यात येईल. निवड झालेल्या उमेदवारांना त्या-त्या शहरातील कोणत्याही अंगणवाडी केंद्रावर काम करावे लागेल. उमेदवाराची एकदा नियुक्ती झाल्यावर कोणत्याही परिस्थितीत त्यांची इतर ठिकाणी बदली करता येणार नाही, तसेच त्यांचे निवासस्थानापासुन नियुक्ती देण्यात आलेल्या ठिकाणापर्यंत कोणताही प्रवासभत्ता अनुज्ञेय राहणार नाही. त्याचप्रमाणे नियुक्ती झालेल्या ठिकाणी सतत गैरहजर राहिल्यास त्यांची नियुक्ती खंडीत करणेत येईल. (Anganwadi Bharti 2025 Maharashtra)

19) प्रतिक्षा यादी: एकुण प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारावर उमेदवारांची प्रतिक्षा यादी ठेवण्यात येईल. काही कारणामुळे उमेदवार नियुक्ती आदेशाच्या दिनाकांपासुन ३० दिवसांत रुजु न झाल्यास किंवा त्यांस अपात्र ठरविण्यात आल्यास प्रतिक्षा यादीतील गुणानुक्रमानुसार पुढील उमेदवारांस नियुक्ती देण्यात येईल व सदर क्षेत्रात कोणत्याही कारणास्तव पद रिक्त झाल्यास अथवा नविन पद निर्मिती झाल्यास प्रतिक्षा यादीतील उमेदवारांस गुणानुक्रमे नियुक्ती देण्यात येईल. सदर प्रतिक्षा यादी निकाल जाहीर झाल्यापासुन एक वर्ष वैध राहिल. (अंगणवाडी भरती 2025 महाराष्ट्र)
20) सेवा समाप्तीसाठी वयाची अट नियुक्त होणा-या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दि.१३ डिसेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयाव्दारे सेवानिवृत्तीचा दिनांक निश्चित केलेला आहे. तसेच अंगणवाडी सेविका / मदतनिस यांची सेवा वयाची ६० वर्षे पुर्ण होईपर्यंत किंवा त्या शारीरिक दृष्टया काम करण्यास सक्षम नसल्यास यापैकी जे आधी घडेल तोपर्यंतच सुरु ठेवण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : फेब्रुवारी 2025 ही शेवटची दिनांक आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : सबंधित पत्त्यावर. (अधिकृत जाहिरात पहा.)
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!