
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
महिला व बालविकास विभाग द्वारे जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकवाडी आणि वनकुटे (अहिल्यानगर) गावांमध्ये अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका या पदांसाठी एकूण ०६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. १२वी उत्तीर्ण असलेल्या आणि या क्षेत्रातील समाजसेवेची आवड असलेल्या महिला उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा रु. ७,५००/- इतके वेतन/मानधन दिले जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १२ जून २०२५ पासून सुरू झाली असून, ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ जून २०२५ आहे (शासकीय सुट्ट्यांचे दिवस वगळून). इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज “एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय, भाळवणी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर” या पत्त्यावर वेळेत सादर करावेत.