
पुर्ण PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांचे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई या आयुक्तालयाचे अधिनस्त 104 नागरी प्रकल्पा मधील गट-क संवर्ग, मुख्यसेविका यांची सरळसेवेने 102 रिक्त पदे भरण्या करिता पात्र महिला उमेदवारा कडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरील रिक्त पदभरती प्रक्रियेशी संबंधित सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतची सुविधा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई यांनी संकेतस्थळावर दि. 14 ऑक्टोंबर 2024 पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवाराने संकेतस्थळावरील संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज व परिक्षा शुल्क ग्राह्य धरण्यात येतील याची नोंद घ्यावी. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज व परिक्षा शुल्क ग्राह्य धरले जाणार नाही.
भरती करावयाच्या पदाची वेतन श्रेणी संवर्ग निहाय आरक्षण व पदसंख्या, संबंधित पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, परीक्षा अभ्यासक्रम व इतर अर्हता जाहिरातीमध्ये सविस्तर नमूद करण्यात आलेल्या आहेत. सदरील भरती प्रक्रिया केवळ ऑनलाईन पद्धतीन (Computer Based Test) परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेसंदभांत सर्व कार्यक्रम वेळापत्रक, वेळापत्रकातील बदल व सुचना या आयुक्तालयाचे संकेतस्थळ https://www.icds.gov.in वर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील व त्या सर्वांना बंधणकारक राहतील. या बाबत अर्ज करणाऱ्या उमेदवारांशी स्वतंत्रपने कुठलाही पत्रव्यवहार केला जाणार नाही. 03 नोव्हेंबर 2024 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख आहे. या भरतीची पुर्ण pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक वरती दिली आहे.