Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : महाराष्ट्र शासनची नोकरी शोधताय? महिला व बाल विकास विभाग अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना व्दारे मुख्यसेविका या पदांची सरळसेवा भरती करीता फक्त पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. या भरती मध्ये मुख्यसेविका यांची 102 पदे भरण्यांत येणार आहेत. या भरतीची जाहिरात महिला व बालविकास विभाग द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 35,400 ते 1,12,400 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. अंगणवाडी मुख्यसेविका भरतीची पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : Under the Women and Child Development Department, applications have been started from only eligible candidates for the direct service recruitment of the posts of Chief Servant under the Integrated Child Development Service Scheme. In this recruitment, 102 posts of Chief Servant will be filled.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.
◾भरती विभाग : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत ही पदे भरली जात आहेत.
◾भरती पदाचे नाव : अंगणवाडी मुख्यसेविका / अंगणवाडी सुपरवाइझर / पर्यवेक्षिका.
◾लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 35,400 ते 1,12,400 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾या भरतीची पुर्ण PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली उपलब्ध करून दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत.
◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 21 ते 38 वर्ष दरम्यान असेल ते उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. (मागासवर्गीय व इतर उमेदवारांना शिथिलता)
◾भरती कालावधी : कायमस्वरुपी (Permanent) नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे.
◾निवड प्रक्रिया : मुख्यसेविका या पदांसाठी परिक्षा नियमावली नुसार सर्व पात्र उमेव्दारांची लेखी परिक्षा एकाच वेळी घेण्यात येईल. या करिता एकूण 200 गुणांचे वस्तुनिष्ठ स्वरुपाची (Objective) पेपर असेल व प्रत्येक प्रश्नास दोन गूण असतील.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Government Job in Maharashtra)
◾मुख्यसेविका कर्तव्य व जबाबदाऱ्या :
1] अंगणवाडी सेविकांच्या कामाचे पर्यवेक्षिकां कडून पर्यवेक्षण करणे, नागरी भागातील 25 अंगणवाड्यांसाठी एक मुख्यविका पर्यवेक्षि का असेल तसेच तिच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे असतील.
अ-पर्यवेक्षिका संबंधित अंगणवाडी सेविकांसह अंगणवाड्यांचा कार्यक्रम आखतील.
ब-अंगणवाडी सेविकांना क्षत्रीय समस्या निवारण करणे.
क-कुटुंबांची यादी तयार करणे, लोकसंख्येचे लक्ष्य गट ओळखणे यासाठी मदत आणि मार्गदर्शन करेल.
ड-सर्व जन्म आणि मृत्यूच्या नोंदी अद्ययावत ठेवणे.
2] वेळोवेळी अंगणवाडीतील सर्व नोंदी, रजिस्टर्स, रोख आणि खाती, साठा आणि साहित्य तपासेल आणि अंगणवाडी सेविकांना या संदर्भात आवश्यक सूचना आणि सूचना देईल आणि अंगणवाडी सेविकांकडून मासिक प्रगती अहवाल नियमितपणे सादर करण्याची खात्री करेल.
3] अंगणवाडी सेविका आणि CDPO तसेच अंगणवाडी सेविका आणि PHC कर्मचारी, विशेषतः L.HVs यांच्यात संपर्क व संमन्वय करणे.
4] व इतर कर्तव्य व जबाबदाऱ्या.
◾शेवटची दिनांक : या भरतीसाठी तुम्ही 03 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.