पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
12वी पास असाल आणि काम शोधत असाल तर ही उत्तम संधी आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी, प्रकल्प अमरावती व्दारे अंगणवाडी केंद्रातील रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये अंगणवाडी मदतनीस ही पदे भरली जाणार आहेत. 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
या भरतीसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवार हा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यासाठी उमेदवाराकडे खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे. 1] गैस कार्ड/ बैंक पासबुक महिना अगोदरचे, 2] आधार कार्ड, 3] मतदान कार्ड, 4] घर टॅक्स पावती, 5] चालु इलेक्ट्रीक बील, 6] शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, 7] शैक्षणिक पात्रतेकरीता गुणपत्रिका, 8] शाळा सोडल्याचा दाखला, 09] विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र, 10] जात प्रमाणपत्र, 11] लहान कुटूंबाबाबत प्रतिज्ञापत्र, 12] अनुभव असल्यास प्रमाणपत्र यापैकी कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
अनुसूचित जाती / अनु जमाती / इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती / भटक्या जमाती /.आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक / विशेष मागास प्रवर्ग या उमेदवारांनी प्रमाणपत्र सोबत जोडावे. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन (Offline) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2024 आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.