
pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
आरोग्य विभाग मध्ये नोकरी शोधताय? वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष, महाराष्ट्र राज्य अंतर्गत गट-क संवर्गातील सरळसेवा भरती २०२५
वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष आयुक्त यांच्यामार्फत शासकीय वैद्यकीय/दंत महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयांमधील गट-क तांत्रिक/अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी स्पर्धा परीक्षा २०२५ करिता ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾महत्वाच्या तारखा:
▪️ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होण्याची तारीख व वेळ: १९ जून २०२५, गुरुवार सायं. ०५:०० पासून.
▪️ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक व वेळ: ०९ जुलै २०२५, सायं. ११:५५ पर्यंत.
◾रिक्त पदांचा तपशील (तांत्रिक संवर्ग):
▪️ग्रंथपाल: ५ पदे (वेतनश्रेणी S-14: ३८६०० – १२२८००)
▪️आहारतज्ञ: १८ पदे (वेतनश्रेणी S-14: ३८६०० – १२२८००)
▪️समाजसेवा अधिक्षक (वैद्यकीय): १३५ पदे (वेतनश्रेणी S-14: ३८६०० – १२२८००)
▪️भौतिकोपचार तज्ञ: १७ पदे (वेतनश्रेणी S-14: ३८६०० – १२२८००)
▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ: १८१ पदे (वेतनश्रेणी S-13: ३५४०० – ११२४००)
▪️ई.सी.जी. तंत्रज्ञ: ८४ पदे (वेतनश्रेणी S-13: ३५४०० – ११२४००)
▪️क्ष किरण तंत्रज्ञ: ९४ पदे (वेतनश्रेणी S-13: ३५४०० – ११२४००)
▪️सहायक ग्रंथपाल: १७ पदे (वेतनश्रेणी S-10: २९२०० – ९२३००)
▪️औषधनिर्माता: २०७ पदे (वेतनश्रेणी S-10: २९२०० – ९२३००)
▪️दंत तंत्रज्ञ: ९ पदे (वेतनश्रेणी S-10: २९२०० – ९२३००)
▪️प्रयोगशाळा सहायक: १७० पदे (वेतनश्रेणी S-7: २१७०० – ६९१००)
▪️क्ष किरण सहायक: ३५ पदे (वेतनश्रेणी S-7: २१७०० – ६९१००)
▪️ग्रंथालय सहायक: १३ पदे (वेतनश्रेणी S-06: १९९०० – ६३२००)
▪️प्रलेखाकार/ग्रंथसुचीकार (डॉक्युमेंटालिस्ट/कॅटलॉगर): ३६ पदे (वेतनश्रेणी S-06: १९९०० – ६३२००)
▪️वाहन चालक: ३७ पदे (वेतनश्रेणी S-06: १९९०० – ६३२००)
◾एकूण तांत्रिक संवर्ग पदे: १०५८
◾रिक्त पदांचा तपशील (अतांत्रिक संवर्ग – मुंबई बाहेरील पदे):
▪️उच्च श्रेणी लघुलेखक: १२ पदे (वेतनश्रेणी S-16: ४४९०० – १४२४००)
▪️निम्नश्रेणी लघुलेखक: ३७ पदे (वेतनश्रेणी S-15: ४१८०० – १३२३००)
◾एकूण अतांत्रिक संवर्ग पदे: ४९
◾एकूण पदे (अ + ब): ११०७
◾शैक्षणिक अर्हता: अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत (०९.०७.२०२५) सेवाप्रवेश नियमांनुसार संबंधित पदांसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता व अनुभव पूर्णतः धारण करणे अनिवार्य आहे. सविस्तर शैक्षणिक अर्हतेसाठी कृपया संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
◾वयोमर्यादा: वयोमर्यादा गणण्याचा दिनांक ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असेल.
▪️खुला प्रवर्ग: १८ वर्षांपेक्षा कमी व ३८ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
▪️मागासवर्गीय उमेदवार: १८ वर्षांपेक्षा कमी व ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावे (क्रिमीलेअर वगळून).
▪️इतर प्रवर्गांसाठी वयोमर्यादेत सवलती लागू आहेत, सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.
◾परीक्षा शुल्क:
▪️खुला प्रवर्ग: रु. १०००/-
▪️मागासवर्गीय प्रवर्ग: रु. ९००/- (१०% सूट)
परीक्षा शुल्क ना परतावा (Non Refundable) आहे.
◾परीक्षेचे स्वरूप: परीक्षा ऑनलाइन (Computer Based Online Examination) पद्धतीने घेतली जाईल. प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी भाषेत वस्तुनिष्ठ, बहुपर्यायी स्वरूपाची असेल. प्रत्येक प्रश्नाला ०२ गुण असतील.
अर्ज केवळ www.med-edu.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीनेच सादर करावेत. इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज किंवा शुल्क ग्राह्य धरले जाणार नाही.
टीप: भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व सूचना आणि वेळापत्रकातील बदल कार्यालयाच्या www.med-edu.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध केले जातील. उमेदवारांना कोणताही स्वतंत्र पत्रव्यवहार केला जाणार नाही. आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष, महाराष्ट्र राज्य यांनी भरती प्रक्रिया/परीक्षा स्थगित करणे किंवा रद्द करणे, तसेच पदसंख्या, आरक्षण आणि अटी व शर्तींमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार राखले आहेत. त्यांचा निर्णय अंतिम राहील.