राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू! Arogya Vibhag Bharti 2023

Arogya Vibhag Bharti 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान व्दारे नवीन पदांसाठी जाहिरात प्रसिध्द करणेत आली आहे. तरी इच्छूक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, गुणपत्रिका व आवश्यक कागदपत्रांची छायांकित केलेल्या साक्षांकित / सत्य प्रतीसह उपरोक्त नमुद केलेल्या रिक्त पदांसाठी आपले अर्ज स्विकारण्याची मुदत दि. १२/०६/२०२३ पासून ते दि. २६/०६/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजेपासुन ते ०५.०० वाजेपर्यंत (सुटटीचे दिवस वगळून) स्विकारण्यात येतील. जे उमेदवार पात्र असतील त्यांनी खाली दिलेली पुर्ण PDF जाहिरात खाली पहा व अर्ज करा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Arogya Vibhag Bharti 2023 : Rashtriya Arogya Abhiyan has published advertisement for new posts. However, the interested candidates should submit their applications for the above mentioned vacancies along with the application in the prescribed format, mark sheet and shadowed attested / true copies of the required documents. From 12/06/2023 to dt. 26/06/2023 will be accepted from 10.00 am to 05.00 pm (excluding holidays).

महत्वाची माहिती :

◾भरायची पदे : प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ भूलतज्ञ, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, चिकित्सक, बालरोगतज्ञ, नेत्रतज्ञ, त्वचारोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, ENT विशेषज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (M.D), एपिडेमियोलॉजिस्ट, औषध निर्मिती अधिकारी, ANM
◾अर्ज शुल्क : सर्वसाधारण 150 रूपये व राखीव प्रवर्ग 100 रूपये अर्ज शुल्क आकारले गेले आहे.
◾वयोमर्यादा : 70 वर्ष पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (पदानुसर वयोमर्यादा वेगवेगळी आहे.)
◾अर्ज स्विकारण्याची पत्ता – वैदयकीय आरोग्य अधिकारी, आरसीएच कार्यालय, पाण्याच्या टाकीखाली, आपटा पोलिस चौकी शेजारी, उत्तर शिवाजी नगर, सांगली – ४१६४१६
◾नोकरी ठिकाण : सांगली
◾शेवटची दिनांक : 26 जुन 2023 ही अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख आहे. त्या अगोदर अर्ज करा.
◾अधिक माहिती व पुर्ण जाहिरात खाली दिली आहे.

◾ भरती करण्यात येणाऱ्या पदांची नावे, रिक्त पद संख्या व मासिक वेतन :

पदाचे
नाव
पद संख्यामासिक
वेतन
ANM0418,000 रूपये प्रति महिना
औषध निर्मिती अधिकारी0117,000 रूपये प्रति महिना
एपिडेमियोलॉजिस्ट0135,000 रूपये प्रति महिना
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (M.D)0175,000 रूपये प्रति महिना
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी0130,000 रूपये प्रति महिना
विशेषज्ञ भूलतज्ञ0175,000 रूपये प्रति महिना
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी0360,000 रूपये प्रति महिना

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ANMANM व MNC Registration अनिवार्य आहे.
औषध निर्मिती अधिकारीD.Pharmacy
एपिडेमियोलॉजिस्टANY MEDICAL GRADUATE WITH MPH/MHA/MBA IN HEALTH
सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (M.D)MBBS With MD MICROBIOLOGY
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीM.B.B.S MCI/MMC
विशेषज्ञ भूलतज्ञMD/Anesth/DA
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारीM.B.B.S MCI/MMC
जाहिरात येथे क्लीक करा
अर्जयेथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ येथे क्लीक करा

भरतीसाठी अटी व शर्ती :

 • पदभरती प्रक्रियेकरिता प्रत्येक अर्जाकरिता अराखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १५०/- (अक्षरी रक्कम रु. एकशे पन्नास फक्त) व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.१००/- (अक्षरी रक्कम रु. शंभर रुपये फक्त) चा धनाकर्ष (Demand Draft) जोडणे आवश्यक आहे. सदरचे शुल्क हे नापरतावा (Non-Refundable) असुन सदरचा (Demand Draft) Integrated Health and Family Welfare Society Sangli, Sangli Miraj and Kupwad City Corporation या संपुर्ण नावाने असावा. अर्जावर एकदम वरच्या बाजूस जोडण्यात यावा. डिमांड ड्राफटच्या मागील बाजुस उमेदवारांने त्यांचे संपुर्ण नाव, अर्ज सादर केलेल्या पदाचे नाव पद क्रमांक टाकावा. डिमांड ड्राफटच्या नावामध्ये चुक आढळल्यास अथवा खराब असल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज पदभरतीच्या पुढील संपुर्ण प्रक्रियेकरिता ग्राहय धरला जाणार नाही, यांची उमेदवारांची जाणीवपुर्वक नोंद घेण्यात यावी. धनाकर्ष (Demand Draft) राष्ट्रीयकृत बँकेचा आसावा.
 • उपरोक्त नमुद केलेले पद ११ महिने २९ दिवस कंत्राटी तत्वावर कराराव्दारे भरणेत येत आहे. सन २०२३-२४ च्या कृती आराखडयामध्ये सदर पदांची मंजुरी प्राप्त न झाल्यास वरील पदाची सेवा आपोआप संपुष्टात येईल. परंतु वरील पद सन २०२३ २४ मध्ये मंजुर झाल्यास पुढील ११ महिने २९ दिवसाची नियुक्ती समाधानकारक कार्यकालानंतर देण्यात येईल.
 • वरील नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकिय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही. तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागु नाहीत. उपरोक्त कंत्राटी पदांकरीता दरमहा एकत्रित मानधन देण्यात येईल, अनुभवी व उच्च दशैक्षणिक अर्हता धारकारा प्राधान्य दिले जाईल.
 • सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे दिनांक २५ एप्रिल २०१६ चे शासन निर्णयास अनुसरुन अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांकास पदासाठी कमाल वयोमर्यादा अराखीव प्रवर्गासाठी ३८ वर्षे व राखीव प्रवर्गासाठी ४३ वर्षे राहील व वैदयकीय अधिकारी विशेषतज्ञख अतिविशेषतज्ञ यांची कमाल वयोमर्यादा ७० वर्ष राहील. तसेच एनएचएम अंतर्गत काम केलेल्या अथवा करीत असलेल्या उमेदवारांना ५ वर्षे वयोमर्यादा शिथील राहील.
 • सहसंचालक (अतांत्रिक), राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे क्र. राआसो/ मनुष्यबळ / आरक्षण/२४५६४-७७४ /१६ दि. २०/०७/२०१६ रोजीच्या पत्रानुसार आवश्यक असणाच्या आरक्षित सर्वगातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या इतर संवर्गातील उमेदवारांचा विचार करण्यात येईल.
 • उमेदवारांने एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज सादर करायचा असल्यास, प्रत्येक पदाकरीता स्वंतत्रपणे अर्ज सादर करावा. अर्जासोबत पदांचा प्राधान्यक्रम मुलाखतीचे पुर्वी कार्यालयास सादर करावा. परंतु वेळप्रसंगी एकाच वेळी मुलाखत / परिक्षा घेतली गेल्यास कोणत्या तरी एका पदाकरीता उपस्थित रहावे लागेल, ज्यास उपस्थित राहील. त्या पदाकरीता संबंधित उमेदवार ग्राहय धरून, दुसऱ्या पदाकरीता गैरहजर ग्राहय धरण्यात येईल.
 • निवड यादीतील गुणाक्रमांकाचे आधारे प्राधान्यक्रमाने पदस्थापना दिली जाईल. त्याबाबत उमेदवाराने कोणत्याही दबावतंत्राचा वापर केल्यास उमेदवाराची निवड रदद करण्यात येईल. उपरोक्त पदांकरिता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाच्या संख्येनुसार छाननी करुन गुणानुक्रमे यादी तयार करण्यात येवून गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. निवड समितीचा निर्णय अंतिम राहील..
 • उपरोक्त पदांपैकी तांत्रिक पदांकरिता तत्सम कौन्सिलचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील, अन्यथा उमेदवारास अपात्र ठरविणेत येईल. ९. केंद्र / राज्य शासनाने संबंधित पद नामंजूर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पुर्वसुचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
 • सवर्ग पदांकरिता उमेदवारांनी अर्ज सादर करताना प्रथम विहित नमुन्यात अर्ज १० वी गुणपत्रक आणि सनद(जन्म तारीख पुरावा म्हणून), १२वी गुणपत्रक आणि सनद पदवीचे गुणपत्रक (१ ले वर्ष ते अंतिम वर्ष सर्व Attempt सह- जेणेकरून एकत्रित गुण काढणे शक्य होईल), पदवी प्रमाणपत्र (Convocation Certificate), ज्या- त्या शैक्षणिक अर्हतेस संबंधित परिषदेकडील नोंदणी लागू आहे त्या त्या शैक्षणिक अर्हतेची वैद्य असलेली परिषदेकडील नोंदणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वय अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणून (शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचा दाखला) व इतर आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत झेरॉक्स प्रतीत (साक्षांकित / स्वसाक्षांकित) करुन जोडावीत. अर्ज सादर केल्याची पोहोच घेणेकरिता अर्जाची वरील पृष्ठभागाची झेरॉक्स घेऊन येणे. नावात बदल असल्यास राजपत्र, विवाह नोंदणी आणि नोटराईज्ज अॅफिडेव्हिट जोडणे बंधनकारक राहील.
 • अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
 • उमेदवारांनी अर्ज करीत असलेल्या पदाचे नांव व सामाजिक आरक्षणानुसार सदर पदाकरीता नमुद प्रवर्ग (जातीचा प्रवर्ग), बँकेचे नाव व डिमांड ड्राफट क्रमांक अर्जामध्ये स्पष्टपणे नमुद करावा.
 • अर्ज सादर करणेकामी व मुलाखतीकरिता उपस्थित उमेदवारांना प्रवासभत्ता व इतर कुठलाही भत्ता देय राहणार नाही. तसेच भरती प्रक्रिये दरम्यान ज्या-ज्या वेळी उमेदवारांनी बोलविण्यात येईल, त्या-त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. तसेच सदर उपस्थितीकरिता कोणतेही मानधन अथवा प्रवास खर्च देय राहणार नाही.
 • वैदयकीय अधिकारी व विषेततज्ञ पदासाठी सुचना वैदयकीय अधिकारी व विशेषतज्ञ या पदासाठी अर्ज उपलब्ध न झालेस इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज व प्रमाणपत्राच्या मुळ प्रती व सांक्षाकित केलेल्या छायांकित प्रतीसह थेट लाखतीसाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी सदरील मुलाखती घेणेत येईल, तसेच सदर दिवशी सुट्टी असल्यास मागील दिवशी (गुरुवारी) मुलाखती घेणेत येतील याची नोंद घ्यावी.
 • सदर रिक्त पदांच्या संख्येत, शैक्षणिक अर्हता, मानधन, वयोमर्यादा, सामाजिक आरक्षण, नियुक्ती ठिकाणामध्ये बदल, नमुद केलेल्या अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार हे या कार्यालयाचे असुन निवड प्रक्रियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार, आयुक्त तथा अध्यक्ष पदभरती निवड समिती, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका, सांगली यांनी राखुन ठेवलेले आहेत. ऐनवेळी मार्गदर्शक सुचनांनुसार पदसंख्येत बदल झालेस त्याबाबत उमेदवारांना आक्षेप घेता येत नाही.
 • राष्ट्रीय आरोग्य अभियान मधील सर्व स्तरावरील पदे ही निव्वळ कंत्राटी स्वरुपाची असल्याने, सद्यस्थितीत बदलीबाबत कोणतेही धोरण नसल्याने उमेदवारांस नियुक्ती दिल्यानंतर पदस्थापनेत बदल करुन दिला जाणार नाही यांचे उमेदवारांनी नोंद घ्यावी. अर्जदाराला कंत्राटी कालावधीत त्यांचे सोईनुसार ठिकाण बदलुन मिळण्याची मागणी करता येणार नाही.
 • मागासवर्गीय उमेदवारानी अर्ज आरक्षणामधून सादर करावयाचा असल्यास. अर्जासोबत जात प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल. अन्यथा अर्ज अपात्र ठरविण्यात येतील. कंत्राटी स्वरुपाची पदे असल्याने जात वैधता प्रमाणपत्राची (Caste Validity) आवश्यकता नाही.
 • उमेदवाराने अर्ज सादर केलेल्या पदांशी निगडीत संबंधित उमेदवारांस अनुभव असल्यास सदरील अनुभव ग्राहय धरण्यात येऊन त्याबाबचे नियमावलीनुसार गुण देण्यात येईल यांची उमेदवारांनी नोंद घेण्यात यावी.. क्षेत्रातील सदर पदाशी निगडीत नसलेला अनुभव असल्यास सदरील अनुभव हा ग्राहय धरला जाणार नाही यांची उमेदवारांनी नोंद घेण्यात यावी.. इतर
 • उमेदवारांकडून अर्धवट, अपुर्ण, वाचण्यायोग्य नसलेला अर्ज सादर केले गेला असल्याने, संबंधित उमेदवारांचा अर्ज नाकारला गेल्यास, अथवा अपात्र ठरला गेल्यास त्याबाबतची सर्वस्वीपणे संपुर्ण जबाबदारी संबंधित उमेदवारांची राहील याबाबत उमेदवारांकडून कोणत्याही स्वरुपाची तक्रार स्विकारली जाणार नाही. अर्ज ‘भरणेकामी काही अडचणी असल्यास कार्यालयास समक्ष भेट देऊन विचारणा करण्यात यावी.
 • उमेदवार संबंधित पदासाठी शाररीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच उमेदवारांविरुध्द कोणत्याही स्वरुपाचा गुन्हा झालेला नसावा.
 • उमेदवारांनी वर नमुद केलेल्या कालावधीमध्ये, कार्यालयीन दिवशी, दिलेल्या वेळेत व्यक्तीशः उपस्थित राहुन अर्ज सादर करण्यात यावेत. नमुद मुदती अगोदर अथवा मुदतीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाहीत. याबाबत उमेदवारांकडून कोणत्याही स्वरुपाची तक्रार अथवा कोणताही दबाव आणण्याची प्रयत्न करू नये.
 • उमेदवारांची निवड पुर्ण करण्याआधी उमेदवारांना बोलावून त्यांचे अर्जाशी निगडीत सर्व मुळ कागदपत्राची पडताळणी करण्यात येईल. त्यावेळी उमेदवारांनी सदर मुळ (Original) कागदपत्र, जाहिरातीसोबत जोडलेले लहान कुटूंबांचे नमुना-अ प्रपत्र इ. कागदपत्र पडताळणी समितीसमोर सादर करणे बंधनकारक राहील, अन्यथा उमेदवारास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. २३. मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना करारपत्रातील अटी मान्य असल्यास तसा करारनामा रु.१००/- बॉन्ड पेपरवर पदावर रुजू होताना दयावा लागेल.
 • मा. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार गुणांकन केल्यावर गुणानुक्रमानुसार अधिकतम गुण मिळालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. सदर यादीबाबत आक्षेप असल्यास ते सादर करण्याकरिता पाच दिवसाची मुदत देणेत येईल. आक्षेपसोबत त्यांच्या पृष्टयर्थ योग्य पुरावे सादर करण्यास सुचित करणेतस सुचित करणेत येईल.
 • निवड प्रक्रियेतील पात्र / अपात्र उमेदवारांची यादी, भरती प्रक्रियेची माहिती मा. शासनाच्या www.nrhm.maharashtra.gov.in व www.arogya.maharashtra.gov.in या वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येईल. याबाबत कुठलाही स्वतंत्र पत्रव्यवहार उमेदवारांसोबत केला जाणार नाही.
 • निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्यापासून ७ दिवसांमध्ये नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांची नियुक्ती आदेश आपोआप संपुष्टात आणून, प्रतिक्षाधिन यादीतील पुढील उमेदवारास नियुक्ती देण्यात येईल.
 • सदरची भरतीची प्रक्रिया पुर्ण झालेनंतर भविष्यात जर एखादया ठिकाणी कर्मचारी यांनी राजीनामा दिलेमुळे जागा रिक्त झालेस प्रतिक्षा यादीतील मेरिटमधील पुढील उमेदवारास नविन भरती प्रक्रिया न करता नियुक्ती आदेश दिले जातील. सदर अंतिम निवड यादी ही तयार झालेनंतर वेबसाइटवर प्रसिध्द झालेनंतर पुढील वर्षापर्यंत वैध राहील.
 • अर्जदारांनी एका पेक्षा जास्त पदासाठी अर्ज करावयाचा असल्यास स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र धनाकर्ष असणे आवश्य५ आहे. तसेच अर्जदारांनी कोणत्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचा उल्लेख सोबत जोडलेल्या अर्जामध्ये नमुद करणे आवश्यक आहे.
 • भरती प्रक्रिया स्थगित करणे / रदद करणे/पदभरती प्रक्रियेत बदल करण्याचे सर्व अधिकार मा. आयुक्त सांभिकु मनपा यांच्या स्तरावर राखून ठेवण्यात आले आहेत. याबाबत कोणालाही कोणताही दावा करता येणार नाही.
 • ज्या पदांकरीता कौशल्य चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे त्या पदांकरिता पात्र उमेदवारांस नियुक्ती आदेश देण्यापुर्वी त्याची महानगरपालिका स्तरावर कौशल्य चाचणी घेण्यात येईल. सदर कौशल्य चाचणीमध्ये सदर उमेदवार पात्र ठरल्यास त्यास नियुक्ती आदेश देण्यात येतील अन्यथा नाही. ३१. अर्जासोबत नमुद करण्यात येत असलेला मोबाईल क्रमांक हा संपुर्ण पदभरती प्रक्रिया होईपर्यंत चालु स्थितीत राहण्याची दक्षता उमेदवारांनी घेण्यात यावी. अर्जाचा नमुना हा संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला असून, सदरील नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवाराचा अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाही.
error: Content is protected !!