Arogya Vibhag Bharti 2023 : आरोग्य विभागात सरकारी नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी आहे. आरोग्य विभागात मोठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय यांच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय/ दत्त / आयुर्वेद / होमीओपॅथीक / महाविद्यालय व सलग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र या मध्ये अनेक पदे रिक्त झाली होती. ती रिक्त पदे भरण्यासाठी ही मोठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी गट क परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धापरीक्षेसाठी अर्हताप्राप्त उमदेवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी लागणारी उमदेवारांची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशिल शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा पदनिहाय अभ्यासक्रम आणि अर्ज करणेसाठी मार्गदर्शक सुचना व पुर्ण जाहिरात खाली दिली आहे.
Arogya Vibhag Bharti 2023 : Good opportunity for candidates trying to get government jobs in health department. A major recruitment process has started in the health department. Applications are invited from eligible candidates in prescribed format. Educational qualification of candidates for this recruitment, details of posts constitutional reservation and parallel reservation as per government rules, post wise syllabus of competitive examination and guidelines for applying and complete advertisement are given below.
◼️ भरती बद्दल महत्वाची माहिती :
◾पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक, लघुलेखक, लिपिक, ग्रंथपाल, लघुटंकलेखक, गृहपाल, किरण सहाय्यक, वायरमन, नर्स, ग्रंथालय सहाय्यक, वसतिगृह अधिक्षक, शिंपी, फोटोग्राफर, ड्रायवर, सहाय्यक ग्रंथपाल, दूरध्वनी चालक, व इतर पदे भरण्यात येणार आहेत.
◾या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी, पदवीधर उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहे. (भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही वेगवेगळी आहे. जाहिरात पहा)
◾एकूण पदे : तब्बल एकूण 05155 पदांची महाभरती आयोजीत केली गेली आहे.
◾अर्ज पद्धति : आँनलाईन (Online) करण्याची सुविधा देण्यात आली आहे. तुम्ही घरूनच अर्ज करू शकणार आहेत.
◾जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
जाहिरात | येथे क्लीक करा |
शैक्षणिक पात्रता | येथे क्लीक करा |
अभ्यासक्रम | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◼️ वयोमर्यादा :
1) सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत (अराखीव प्रवर्गासाठी ३८ वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता (खुल्या प्रवर्गासाठी ४० वर्षे व मागास प्रवर्गासाठी ४५ वर्षे ) देण्यात आली आहे. सरळसेवेतन नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दिनांक ३१ डिसेंबर, २०२३पर्यंत शिथिलता देण्यात आली आहे.
2) शासन निर्णय मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा विहित केली आहे. अशा पदासाठी देखील या शासन निर्णयाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ डिसेंब, २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणा-या सर्व जाहिरातीकरीता अर्ज करणा-या उमदेवारांसाठी संबंधित पदाच्या सेवाप्रवेश नियमात विहित केलेलया कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे इतकी शिथिलता देय राहिल.
3)दिव्यांग उमदेवारांकरिता कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहिल.
4) खेळाडूंकरिता कमाल वयोमर्यादा ०५ वर्षे शिथिलक्षम राहील. तथापि, कोणत्याही प्रवर्गातील उमदेवारांकरीता कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे राहिल.
5) माजी सैनिकाकरिता वयोमर्यादेतील सूट ही सदर उमदेवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालवधी अधिक ३ वर्षे इकी राहील. तसेच अपंग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहिल.
6) प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त उमदेवारांकरिता कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील.
7) अनाथ आरक्षणाकरिता अर्ज करणा-या उमदेवारांना अनुसूचित जाती या प्रवर्गातील उमदेवारांकरिता असलेली ४३ वर्षे इतकी कमाल वयोमर्यादा लागू राहिल.
8) शासकीय कार्यालयात तीन वर्षापर्यंत दरमहा मानधनावर काम केलेल्या व रोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये या अनुभवाची नोंद केलेल्या पदवीधर/पदविकाधारक अशंकालीन उमेदवारांकरीता कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे राहिल.
9) स्वतंत्र सैनिकांचे पाल्यांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहिल.
10) उपरोक्त वयोमर्यादा ही अर्ज स्विकृतीच्या अंतिम दिनांकास विचारात घेतली जाईल.
◼️ पदसंख्या व आरक्षणांसदर्भात सर्वसाधारण तरतुदी :-
1) भरावयाच्या उपरोक्त संवर्ग / पदांचा सामाजिक / समांतर आरक्षणबाबतचा तपशील शासनाच्या मागणीनुसार आहे. तसेच, वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षाणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
2) शासनाकडून पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल प्राप्त झाल्यास याबाबतची माहिती / बदल वेळोवेळी संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
3) विविध मागास प्रवर्ग महिला प्राविण्यप्राप्त खेळाडू, अनाथ इत्यादीसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणा-या आदेशानुसार राहिल.
4) महिलांसाठी आरक्षित पदांकरीता दावा करणा-या उमदेवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी असल्याबाबत तसेच (अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळून) अन्य मागास प्रवर्गातील उमेदवारांना नॉन क्रीमीलेअर मध्ये मोडत असल्याबाबत स्पष्टपणे दावा करणे व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. तसेच महिला व बाल विभाग मंत्रालय, मुंबई यांचे शासन निर्णय क्र. महिला २०२२/प्र.क्र.१२३/कार्या-२, दिनांक ०४ मे २०२३ नुसार खुल्या प्रवर्गातील महिलांकरीता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता खुल्या प्रवर्गातील महिला तसेच सर्व मागास प्रवर्गातील महिलांनी नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करण्याची अट रद्य करण्यात आली आहे.
5) विमुक्त जाती (अ) भटक्या जमाती (ब) भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमदेवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.
6) अर्ज करताना एखादी जात / जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यासच तसेच सक्षम प्राधिका-यांने प्रदान केलेले प्रमाणपत्र उमदेवारांकडे उपलब्ध असेल तर संबंधित जात/ जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.
7) समांतर आरक्षणबाबत शासन परिपत्रक, शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल. विहित करण्यात आलेले प्रमाणपत्र ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी सादर करणे आवश्यक राहील.
8) अद्यावत नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र / आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा म्हणून सक्षम प्राधिका-याने वितरित केलेले व अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैद्य असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
9) कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणा-या उमदेवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधत्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असले.
◼️ खेळाडू आरक्षण :
1) शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादेतील सवलतीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल.
2) प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणा-या उमदेवारांच्या बाबतीत क्रिडा विषयक विहित अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिका-याने प्रमाणित केलेले पात्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकाचे किंवा तत्पूर्वीचे असणे बंधनकारक आहे.
3) खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच तो खेळाडू उमदेवार आरक्षित पदावरील निवडीकरीता पात्र ठरतो. याविषयी पडताळणीकरीता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वी सादर केलेले असणे बंधनकारक आहे. अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडूसाठी आरक्षाकरीता पात्र समजण्यात येणार नाही.
4) कागदपत्रे पडताळणी / मुलाखतीच्यावेळी खेळाडू उमदेवारांनी विहत अर्हता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिका-याने प्रमाणित केलेले निवडीकरीत पात्र ठरतो. याविषयाचा सक्षमप्रिकध याने प्रदान केलेले प्रविण्या प्रमाणपत्र पडताळणीबाबतचा अहवाह सादर केला तरच उमदेवारांचा संबंधित संवगातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर शिफारशी/ नियुक्तीकरीता विचार करण्यात येईल.
5) एकापेक्षा जास्त खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे असणा-या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे करण्याकरीता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
◼️ दिव्यांग आरक्षण :
1) दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या आधारे शासन निर्णय संदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार दिव्यांग व्यक्तीच्या आरक्षणासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या आस्थापनेवरील गट क या संवर्गाची पदे दिव्यांग शासन सेवेसाठी सुनिश्चित केली आहे. सदरहू ते उमदेवार त्या पदासाठी अर्ज करण्यास पात्र राहतील.
2) दिव्यांग व्यक्तीसाठी असलेली पदे भरावयाच्या एकूण पदसंख्येपैकी असतील.
3) दिव्यांग शिफारस उमेदवार कोणत्या सामाजिक प्रवर्गातील आहे. याचा विचार न करता दिव्यांग गुणावत्ता क्रमांकानुसार त्यांची शिफारस करण्यात येईल.
4) लक्षणीय दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या वयोमर्यादेचा अथवा इतर कोणत्याही प्रकारचा फायदा घेऊ इच्छिणा-या उमदेवारांनी शासन निर्णय, मधील आदेशानुसार केंद्र शासनाच्या www.swaylambancard.gov.in अथवा SADM या संगणकीय वितरित करण्यात आलेले नवीन नमुन्यातील दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
◼️ अनाथ आरक्षण :
1) अनाथ व्यक्तीचे आरक्षण शासन निर्णय, यासंदर्भात शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणा-या आदेशानुसार राहील.
2) अनाथांसाठी आरक्षित पदावर गुणवत्तेनुसार निवड झालेल्या उमदेवारांचा समावेश उमेदवार ज्या सामाजिक प्रवर्गाचा आहे. त्या प्रवर्गातून करण्यात येईल.
3) प्रस्तुत पदासाठी अर्ज करतांना अनाथ आरक्षणाचा दावा करणा-या उमदेवारांनी दिनांक ०६ एप्रिल २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे विहित करण्यात आलेल्या कार्यपध्दतीनुसार सुधारित नमुन्यातील अनाथ प्रमाणपत्र व महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. अन्यथा अनाथ आरक्षणाचा दावा विचारात घेतला जाणार नाही.
4) अनाथ आरक्षणासाठी अर्ज करणा-या उमेदवारांस अनुसूचित जाती प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आलेले किमान गुणवत्ता पात्रता लागू राहिल.
◼️ जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब) भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (ड), विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास वर्गीय उमेदवारांना संबंधित आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास विहित प्राधिका-याने निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
◼️ लहान कुटुंबाने प्रतिज्ञापन
उमेदवाराने नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाने प्रतिज्ञापन सादर करणे आवश्यक राहील. तसेच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन सादर करताना त्यामध्ये दोन पेक्षा अधिक अपत्ये नियुक्तीच्या वेळेस हयात असल्यास संबंधित उमेदवार नियुक्तीसाठी अपात्र राहील. शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर नियुक्तीच्यावेळी किंवा त्यानंतर दोन पेक्षा अधिक अपत्ये हयात असल्यास संबंधित उमेदवार शासकीय नियुक्तीसाठी अपात्र राहील.
◼️ परिक्षा शुल्क :
1) अराखीव (अराखीव) रुपये १०००/-
2) मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक / अनाथ – ९००/-
3) उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
4) परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे. (आरोग्य विभाग भरती 2023)
5) कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित / रद्य झालयास पदभरती शुल्क उमेदवारा परत करण्यात येणार नाही.