Arogya Vibhag Bharti 2025 : 15 व्या वित्त आयोगांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रना मध्ये पॉलीक्लिनीक सेवा सुरु करण्यासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. त्याकरिता पात्र उमेदवारांना कडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आरोग्य क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. भरतीची जाहिरात तालुका आरोग्य अधिकारी यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
Arogya Vibhag Bharti 2025 : Recruitment advertisement has been published for starting polyclinic services in urban primary health centers under the 15th Finance Commission. Applications are invited from eligible candidates for the same.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : या भरतीची जाहिरात तालुका आरोग्य अधिकारी द्वारे ही भरती प्रसिद्ध केली आहे.
◾भरती प्रकार : आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : विविध पदे. (जाहिरात पहा)
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
◾मासिक मानधन / वेतन : –
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
Pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
◾पदाचे नाव व आवश्यक पात्रता :
▪️डॉक्टर : MD Medicine/DNB
▪️प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ : MD/MS/Gyn/DGO/DNB
▪️बालरोगतज्ज्ञ : MD/DCH/DNB
▪️नेत्रतज्ज्ञ : MS/DOMS
▪️त्वचातज्ज्ञ : MS/DVD/DNB
▪️मानसोपचारतज्ज्ञ : MD/DPM/DNB
ईएनटी तज्ञ : MS/DORL/DNB.
◾एकूण पदे : 07 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : बुलडाणा.
◾उमेदवारांनी दिनांक २८/०३/२०२५ ते ०९/०४/२०२५ या कालावधीत कार्यालयीन वेळेत सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करावे.
◾अर्जदाराने अर्ज ए4 आकाराच्या कोऱ्या कागदावर करावयाचा असुन त्यामध्ये खालील बाबी अतर्गत असाव्यात.
◾अर्जामध्ये ठळक अक्षरात स्वतःचे नाव, कायमस्वरुपी रहात असलेला पत्ता, दुरध्वनी क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणीक अर्हतेचे सर्व तपशील, अभ्यासक्रमाचे नाव संस्था, विद्यापीठाचे नाव असावे.
◾अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखल नसावा.
◾शासन सेवा व शर्ती अंतर्गत महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती व अटी) नियम १९८१ नुसार सदर नेमनुक नसल्याने त्याअनुशंगाने मिळणारे निवृत्ती वेतन, विमा योजना, भनिनी, अथवा तत्सम कोणत्याही प्रकारचा लाभ मिळण्यास पात्र असणार नाही.
◾आपणास हे आदेश मिळताच ८ दिवसाच्या आंत नेमुन दिलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होणे आवश्यक आहे.
◾केंद्र/राज्य शासनाने संबंधित पदे नामंजुर केल्यास त्यांच्या सेवा कोणतीही पुर्वसुचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येतील.
◾सेवा काळात कोणत्याही सार्वत्रिक निवडनुकीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभाग घेता येणार नाही. तसे निदर्शनास आल्यास त्वरीत कार्यमुक्त करण्यात येईल.
◾अर्थवेळ विशेषज्ञ नियुक्तीसाठी लागु असलेला शासन निर्णय परिपत्रक व मार्गदर्शक सुचना अटि व शर्ती हे लागू राहतील याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾सदरहु उमेदवाराने वरील नमुद केल्याप्रमाणे आवश्यक विहीत नमुन्यातील प्रतीज्ञापत्र (रुपये १०० च्या बॉन्ड पेपरवर) संबंधित कार्यालयाकडे लिहुन देणे आवश्यक आहे. त्याशिवाय आपणास सदरहू पदावर रुजु करुन घेता येणार नाही.
◾अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : ०९ एप्रिल २०२५ पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद हायस्कूल, (मुले) चे आवार बीएसएनएल ऑफीसच्या बाजुला, बुलडाणा.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.