
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका योजनेमध्ये गटप्रवर्तक पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा निवड समिती तथा जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद अकोला यांच्या मार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.
उमेदवाराने किमान पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच एमएस-सीआयटी प्रमाणपत्र, मराठी व इंग्रजी टायपिंग पात्रता (३० श.प्र.मि आणि ४० श.प्र.मि) आणि Word, Excel या सॉफ्टवेअरचे ज्ञान आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दुचाकी वाहन व वैध परवाना असणे आवश्यक आहे. PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
| PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
वयोमर्यादा 21 ते 38 वर्षे असून पात्र उमेदवारांनी आपले पूर्ण भरलेले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, कर्मचारी भवन परिसर, आकाशवाणी केंद्रासमोर, सिव्हील लाईन्स, अकोला येथे 14 नोव्हेंबर 2025 पर्यंत पाठवावेत. अधिक माहितीसाठी व अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.