नोकरी शोधताय? शैक्षणिक क्षेत्रात मोठी भरती प्रक्रिया जाहीर! | Atma Malik Educational and Sports Complex Bharti 2024

Atma Malik Educational and Sports Complex Bharti 2024 : शैक्षणिक विभागांत नोकरी शोधत असाल तर ही भरती तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या भरती मध्ये शिपाई, सुरक्षारक्षक, प्रयोगशाळा सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर, लिपिक, वसतिगृह विभागची पदे, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. तुम्ही 5वी, 7वी, 10वी, 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल तर नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. पात्र तसेच उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. या भरतीच्या जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्द्दल आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

पदे : 1] शिक्षकेतर कर्मचारी : शिपाई, सुरक्षारक्षक, लिपिक, सफाई कर्मचारी, प्रयोगशाळा सहाय्यक, डाटा एंट्री ऑपरेटर, सुपरवायझर (भोजनालय, स्वच्छता व सुरक्षा विभाग), आचारी, आचारी मदतनीस, भांडे साफसफाई, आश्रम मदतनीस, प्रसाद वाटप पुरुष व इतर पदे.
2] वसतिगृह विभाग : वसतिगृह अधीक्षक, अधीक्षिका, पुरुष वसतिगृह शिक्षक, महिला वसतिगृह शिक्षिका, वसतिगृह आया, एनसीसी व मिलिटरी प्रशिक्षक व इतर पदे.
3] प्राथमिक व माध्यमिक विभाग : इंग्रजी, मराठी, हिंदी, समाजशास्त्र, गणित, विज्ञान, संगणक, चित्रकला, व संगीत शिक्षक. ग्रंथपाल व इतर पदे.
4] उच्च माध्यमिक विभाग : इंग्रजी, गणित, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र प्राध्यापक व इतर पदे.
शैक्षणिक पात्रता : 5वी, 7वी, 10वी, 12वी, पदवीधर, डिप्लोमा, B.A/M.A/B.Sc./M.Sc., D.T.Ed./B.Ed. / M.Ed., BCA/BCS/Comp. व इतर शैक्षणिक पात्रता.
◾या भरतीची अधिकृत PDF जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज मागविण्यात येत आहेत.
वयोमर्यादा : 18 वर्ष पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
भरती कालावधी : पर्मनंट (कायमस्वरुपी) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड ही मुलाखत (Interview) द्वारे केली जाणार आहे.
एकूण पदे : एकूण 0140 पदे भरली जात आहेत.
नोकरी ठिकाण : आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल, पुरणगांव, पो. जळगाव नेऊर, ता. येवला, जि. नाशिक हे नोकरी ठिकाण असणार आहे.
मुलाखत दिनांक : २०,२१ व २३,२४ एप्रिल २०२४ या दरम्यान सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत वरील पत्त्यावर थेट मुलाखती होतील.
मुलाखत पत्ता : आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल नाशिक-येवला रोड, मु. पुरणगांव, पो. जळगाव नेऊर, ता. येवला, जि. नाशिक 423401. मो. 9975277651, 9689342839, 9970710163, 8669124700
◾TET/CTET पास उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. इंग्रजी माध्यमासाठी English Speaking Skill अनिवार्य आहे. उमेदवाराच्या गुणवत्ता व अनुभवानुसार आकर्षक वेतन देण्यात येईल. मुलाखतीस येतांना मूळ कागदपत्रे व त्यांची झेरॉक्स प्रत सोबत आणावी तसेच दोन पासपोर्ट साइज फोटो सोबत आणावे, प्रवास व इतर कोणतेही भत्ते दिले जाणार नाहीत,
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!