
📑 अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
🌐 वेबसाईट |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. दि वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., मध्ये शाखाप्रमुख / मॅनेजर / वरिष्ठ अधिकारी ही पदभरती केली जात आहे. महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या व विदर्भ व मराठवाडा विभागामध्ये शाखाविस्तार असलेल्या, सुमारे ७०० कोटींहून अधिक व्यवसाय असलेल्या दि वाशिम अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., वाशीम या नामांकित सहकारी बँकेत नवीन पदभरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾पदाचे नाव: शाखाप्रमुख / मॅनेजर / वरिष्ठ अधिकारी
◾पदसंख्या: ०५
◾शैक्षणिक पात्रता:
उमेदवार वाणिज्य शाखेतील पदवीधर किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवीधर असावा. याशिवाय JAIIB, CAIIB, MBA, DBM, DBF, DCBM किंवा तत्सम पदविका धारकांना प्राधान्य देण्यात येईल.
◾वयोमर्यादा: ३० ते ४० वर्षे दरम्यान असावी.
◾अनुभव:
उमेदवाराकडे कोणत्याही बँक, सहकारी बँक किंवा इतर वित्तीय संस्थांमध्ये शाखा व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकारी पदावर किमान ५ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
◾तांत्रिक पात्रता:
उमेदवारास Excel, MS Office यांसारख्या संगणक प्रणालींचे ज्ञान तसेच नवीन बँकिंग तंत्रज्ञानाची माहिती असणे आवश्यक आहे.
◾बँकेला पदसंख्या कमी-अधिक करण्याचा, पात्रतेत शिथिलता करण्याचा व अंतिम नेमणुकीबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार राखून ठेवलेला आहे.
◾अर्ज करण्याची अंतिम तारीख: २० एप्रिल २०२५
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता / ईमेल:
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज, आवश्यक कागदपत्रांसह wucbl@washimbank.com या ईमेलवर किंवा पोस्टाद्वारे दि. २०.०४.२०२५ पर्यंत पाठवावेत.