पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. महात्मा फुले नागरी सहकारी बँक अमरावती येथे नवीन रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये लिपिक ही पदे भरली जाणार आहेत एकूण 016 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अमरावती (Jobs in Amaravati) मध्ये काम शोधत असाल तर ही चांगली संधी आहे. पदवीधर किंवा पदव्युत्तर व एम. एस. सी. आय. टी. पास असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
तुम्ही या भरतीसाठी पात्र ठरण्यासाठी वयोमर्यादा ही किमान २२ वर्षे आणि कमाल ३५ वर्षापेक्षा जास्त नसावी. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. परीक्षा शुल्क हे रु. ५००/- + (१८% जी.एस.टी.) + बँक व्यवहार शुल्क आहे. नियम व अटी : परीक्षा शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्यानंतर अर्ज सादर (Final Submission) केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. तसेच अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून पुढील प्रक्रियेसाठी सोबत ठेवावी.
ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज एकदा सादर केल्यानंतर कोणत्याही परीस्थितीत बदलता येणार नाही. उमेदवाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असावा, सदर माहिती अथवा तपशील चुकीचा अथवा खोटा आढळल्यास सदर उमेदवाराचा अर्ज नोकर भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. उमेदवाराची बहुपर्यायी प्रश्नांची परीक्षा हि ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्रांची पूर्व तपासणी छाननी न करता घेण्यात येणार असल्याने, या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही.
कागदपत्रांच्या पूर्ण छाननी व तपासणीनंतरच त्याची वैधता पाहून उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल, पात्रता धारण न करणाऱ्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टण्यावर अपात्र करण्याचे संपूर्ण अधिकार असोसिएशन व संबंधित बँकेने राखून ठेवलेले आहेत व याबाबत उमेदवारांना कोणतीही तक्रार करता येणार नाही. उमेदवारांना परीक्षा / कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखचनि उपस्थित राहावे लागेल. आवश्यक असलेल्या पदांसाठी पात्र उमेदवारांची व्यक्तिगत मुलाखत घेण्यात येईल. 11 सप्टेंबर 2024 ही अर्ज मागविण्याची अंतिम तारीख आहे.