बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 500 ऑफिस असिस्टंट (शिपाई) पदांची भरती | शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण | वेतन – 19,500 ते 37,815 रुपये.

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

बँक ऑफ बडोदा मध्ये ५०० ऑफिस असिस्टंट (शिपाई) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. बँकेद्वारे ऑफिस असिस्टंट (शिपाई) या पदासाठी एकूण ५०० रिक्त पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती संपूर्ण भारतभर केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान दहावी (SSC/मॅट्रिक्युलेशन) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यासोबतच स्थानिक भाषेचे ज्ञान असणेही गरजेचे आहे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹19,500 ते ₹37,815 पर्यंत वेतन दिले जाणार आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २६ वर्षे असावे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून, ३ मे २०२५ पासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होईल. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ मे २०२५ आहे.
◾निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी, स्थानिक भाषा चाचणी, कागदपत्र पडताळणी व वैद्यकीय परीक्षा या टप्प्यांद्वारे केली जाईल.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

◾अर्ज शुल्क:
1) खुल्या/सामान्य श्रेणीसाठी: ₹६००/-
2) राखीव श्रेणीसाठी: ₹१००/-
या संधीचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज करावा. ही भरती संधी तुमच्या सरकारी नोकरीच्या स्वप्नपूर्तीस मदत करू शकते!

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा.


error: Content is protected !!