BEST Mumbai Bharti 2024 : बेस्ट उपक्रमाच्या गाड्यांमधून प्रवाशी वाहतुकीसाठी मुंबई मधील गाड्यांसाठी बस चालक व बस वाहक या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करावेत. 8वी, 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी चांगली व खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा. BEST मुंबई मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई एंड ट्रांसपोर्ट मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
BEST Mumbai Bharti 2024 : Applications are invited for the posts of Bus Driver and Bus Conductor for the trains in Mumbai for passenger transportation in the trains of BEST initiative. However, eligible candidates should submit their applications through online (e-mail) mode. | दररोज नवीन जाहिरातींसाठी व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.
◾भरती विभाग : बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाई एंड ट्रांसपोर्ट मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बस वाहतूक विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.
◾पदाचे नाव : बस चालक व बस वाहक.
◾शैक्षणिक पात्रता : 8वी व 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾या भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज सुरू : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : कंत्राटदाराद्वारे ही भरती करण्यात येणार आहे
◾व्यावसायिक पात्रता :
▪️बस चालक – 1] किमान आठवी पास असणे आवश्यक आहे.
2] प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने जारी केलेला प्रवाशी अवजड वाहन परवाना व बॅज (बिल्ला) असणे आवश्यक आहे.
3] किमान १ वर्षाचा प्रवाशी अवजड वाहन चालविण्याचा अनुभव आवश्यक आहे.
▪️बस वाहक – 1] किमान दहावी पास असणे आवश्यक आहे.
2] प्रादेशिक परिवहन प्राधिकरण महाराष्ट्र यांनी जारी केलेला बस वाहकाचा परवाना व बॅज बिल्ला असणे आवश्यक आहे.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (Best Job in Mumbai)
◾इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा ई-मेल द्वारे भरावा.
◾पात्र उमेदवारांस मराठी येणे आवश्यक आहे
◾उमेदवारांनी लक्षात घ्यावे ही भरती कंत्राटदाराद्वारे होणारं आहे.
◾उमेदवारांनी 10 दिवसांच्या आत अर्ज करावा 10 दिवसा नंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
◾इच्छुक उमेदवाराने आपला बायोडाटा,व दिलेली शैक्षणिक पात्रता कागदपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड या सर्व कागदपत्रांचे झेरॉक्स प्रत खालील दिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवावे.
◾जर उमेदवार आवश्यक मूळ पात्रता पाठू शकला नाही तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल.
◾अर्जदाराने चुकीची/बनावट/खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास, उमेदवार/निवडलेल्या उमेदवाराला कोणत्याही टप्प्यावर काढून टाकण्यात येईल व त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पासून 10 दिवसात अर्ज करावा लागणार आहे.
◾ई-मेल पत्ता : recruitment@mutspl.com
◾संपर्कासाठी पत्ता :१२५, पहिला मजला, वडाळा उद्योग भवन, नायगांव, क्रॉस रोड वडाळा, मुंबई ४०००३१.
◾अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्र : ८६५७००१७०१, ८६५७००१७०२,
◾वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण जाहिरात वाचूनच अर्ज करावा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.