मुंबई महानगरपालिका मध्ये 0137 नवीन रिक्त पदांसाठी भरती जाहिर! | BMC BHARTI 2025

BMC BHARTI 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यांतर्गत खाली नमूद करण्यात आलेली विविध संवर्गातील रिक्त पदे भरावयाची आहेत. त्यासाठीची निवड यादी बनविण्याकरिता सदर पदांच्या नमूद केलेल्या अर्हता व अटींची पूर्तता करणा-या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
BMC BHARTI 2025 : The following vacant posts in various categories are to be filled under the Public Health Department of Brihanmumbai Municipal Corporation. Applications are invited from interested candidates who fulfill the mentioned qualifications and conditions for the said posts for the preparation of the selection list.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती प्रकार : मुंबई महानगरपालिका अंतर्गत नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : खाली दिलेली अधिकृत जाहिरात वाचून घ्या.
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत जाहिरात वाचावी.)
मासिक मानधन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 40,000 ते 90,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
भरती कालावधी : आस्थापनेवर विविध संवर्गातील पदे कंत्राटी तत्वावरील भरण्यात येणार आहेत.
पदाचे नाव व इतर आवश्यक पात्रता :
▪️सहाय्यक वैदयकीय अधिकारी :
1] उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची “एम.बी.बी.एस. ” पदवी असणे आवश्यक आहे.
2] उमेदवार महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलशी नोंदणीकृत असावा.
3] एच. एम. आय. एस. (HMIS) संगणकीय प्रणालीमध्ये (जेथे उपलब्ध आहे तेथे) रुग्णांची माहिती स्वतः भरावी लागेल त्यादृष्टीने आवश्यक ते संगणक वापराचे कौशल्य असावे.
4] मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
▪️पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी (PGMO) :
1] उमेदवाराकडे वैधानिक विद्यापीठाची औषध शास्त्र व शरीर चिकित्सा शास्त्र या विषयातील पदवी (एम.बी.बी.एस.) आणि संविधिक विद्यापीठाची संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता असली पाहिजे. (MD/MS/DNB).
2] उमेदवार महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलशी नोंदणीकृत असावा.
3] उमेदवारास पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर सुस्थापित रुग्णालयातील / चिकित्सालयातील या विनिर्दिष्ट विषयांतर्गत कामाचा १ वर्षापेक्षा कमी नाही इतका अनुभव असावा.
4] बंधपत्र (Bond Completion Certificate) ज्या उमेदवारांना लागू असेल त्या उमेदवारांनी बंधपत्र पूर्ण केल्याचे (संबंधित वैदयकिय महाविदयालयाच्या अधिष्ठाता कार्यालयाने दिलेले) प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
5] उमेदवार १०० गुणांचा मराठी विषय घेऊन माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षा उत्तीर्ण असावा.
6] उमेदवार डी.ओ.ई.ए.सी.सी. सोसायटीचे, सी.सी.सी. किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी स्तर किंवा सी स्तर, स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम. एस.सी. आय.टी. किंवा जी.ई.सी.टी. चे प्रमाणपत्र धारक असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरीता शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी/वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.
▪️पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी P.G.M.O.(microbiology) :
1] उपरोक्त २ प्रमाणे तथापि संविधिक विद्यापीठाची microbiology विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता असली पाहिजे.
2] उमेदवाराकडे वैधानिक विद्यापीठाची औषध शास्त्र व शरीर चिकित्सा शास्त्र या विषयातील पदवी (एम.बी.बी.एस.) आणि संविधिक विद्यापीठाची सुक्ष्मजीवशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता असली पाहिजे. (MD/DNB)
▪️वैद्यकीय अधिकारी MO(Radiology) :
1] उमेदवाराकडे वैधानिक विद्यापीठाची “एम.बी.बी.एस.” पदवी आणि संविधिक विद्यापीठाची क्ष-किरणशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य अर्हता असली पाहिजे. (MD/DNB)
2] उमेदवार महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलशी नोंदणीकृत असावा.
3] एच. एम. आय. एस. (HMIS) संगणकीय प्रणालीमध्ये (जेथे उपलब्ध आहे तेथे) रुग्णांची माहिती स्वतः भरावी लागेल त्यादृष्टीने आवश्यक ते संगणक वापराचे कौशल्य असावे.
4] मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
एकूण पदे : 0137 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
नोकरी ठिकाण : मुंबई.
◾रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार आणि आवश्यकतेनुसार तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी तत्त्वावर नेमणूका करण्यात येतील. तथापि नियुक्ती केलेल्या उमेदवारांना महानगरपालिकेतील नोकरीवर हक्क सांगता येणार नाही.
◾जाहिरातींमध्ये दिलेल्या पदांची संख्या बदलण्यासापेक्ष आहे.
◾उपरोक्त संवर्गात नियमित तत्त्वावर कर्मचारी प्राप्त झाल्यास अथवा पदे कमी झाल्यास सदर कंत्राटी उमेदवारांची सेवा संपुष्टात येईल.
◾अर्ज स्वहस्ताक्षरात, सर्व दृष्टीने परिपूर्ण भरलेले असावेत. विहित नमुन्यामध्ये न भरलेले व अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
◾सदर जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mogm.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. उमेदवाराने वेबसाइट उघडण्यासाठी Internet Explorer 6 अथवा त्या वरील आवृत्तीचाच वापर करावा.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 12 फेब्रुवारी 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रमुख वैद्यकीय अधिक्षक व खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा) यांचे कार्यालय, ७ वा मजला, बांद्रा भाभा रुग्णालय इमारत, वांद्रे पश्चिम, मुंबई ४०००५०.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!