Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : मुंबई महानगरपालिकेत नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख अभियंता (घ.क.व्य.) खात्यांतर्गत, उपप्रमुख अभियंता (घ.क.व्य.) प्रचालन अखत्यारीतील समाजविकास कक्षात रिक्त पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्यापूर्वी कृपया खालील अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरातीमध्ये पदांबद्दलची सविस्तर माहिती आणि अर्ज प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी, कृपया खाली अधिकृत जाहिरात पहा.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2025 : This is a great opportunity for eligible and interested candidates who want to get a job in Mumbai Municipal Corporation. Applications are invited for the vacant posts in the Social Development Cell under the jurisdiction of Deputy Chief Engineer (DCE) Operations, under the Chief Engineer (DCE) Department of Brihanmumbai Municipal Corporation.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾पदाचे नाव : मुंबई महानगरपालिकेने समाज विकास अधिकारी पदासाठी अधिकृत भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
◾नोकरी प्रकार : ही सरकारी विभागात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आहे.
◾शैक्षणिक पात्रता: या पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता तपासण्यासाठी अधिकृत जाहिरात वाचा.
◾मासिक वेतन: निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ₹30,000 मानधन दिले जाईल.
◾मुंबई महानगरपालिका भरतीची अधिकृत जाहिरात व अधिक माहिती खाली पहा.
pdf जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिक माहिती | येथे क्लीक करा |
◾अर्ज पद्धती : अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
◾पदाचे नाव: समाज विकास अधिकारी (कंत्राटी)
◾रिक्त पदे: २९ जागा.
◾नोकरी ठिकाण: मुंबई.
◾अर्ज पद्धती: ऑफलाईन (प्रत्यक्ष किंवा टपालाने)
◾अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत: २५ जून २०२५, सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत.
◾आवश्यक पात्रता: या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी खालील पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:
◾शिक्षण: मान्यताप्राप्त विद्यापीठातून समाजकार्य विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW) असणे अनिवार्य.
◾वयोमर्यादा:
▪️१८ ते ४३ वर्षांदरम्यान वय असावे.
▪️अनुभव: सामाजिक क्षेत्रात किंवा स्वयंसेवी संस्थेमध्ये किमान दोन वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.
▪️संगणक ज्ञान: शासनाच्या नियमांनुसार एम.एस.सी.आय.टी. (MS-CIT) परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, किंवा एम.एस. ऑफिस (MS Office), पावर पॉइंट (PowerPoint), वर्ड (Word), एक्सेल (Excel) यांचे ज्ञान असणे आवश्यक आहे आणि त्यासंबंधित प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
▪️टंकलेखन: शासकीय मान्यताप्राप्त संस्थेकडून मराठी टंकलेखनाचे ३० श.प्र.मि. (शब्द प्रति मिनिट) आणि इंग्रजी टंकलेखनाचे ३० श.प्र.मि. प्रमाणपत्रधारकांना प्राधान्य दिले जाईल.
▪️मराठी भाषेचे ज्ञान: मराठीचे ज्ञान असणे आवश्यक आहे (दहावी परीक्षा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे).
▪️अर्ज कसा कराल? : इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज खालील पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा पोस्टाद्वारे पाठवू शकतात:
▪️अर्ज पाठवण्याचा पत्ता:
उपप्रमुख अभियंता (घनकचरा व्यवस्थापन खाते) प्रचालन यांचे कार्यालय,
म्युनिसिपल इमारत ६ वा मजला,
पंतनगर बेस्ट डेपोच्या मागे,
पंतनगर मनपा यानगृह, घाटकोपर (पूर्व),
मुंबई-४०००७५.
◾अधिक माहितीसाठी: पदांची संख्या, अर्ज करण्याची सविस्तर पद्धत, निवड प्रक्रिया आणि इतर सर्व महत्त्वाच्या सूचनांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या: http://portal.mcgm.gov.in
◾कृपया अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याची शिफारस करण्यात येते.