मुंबई महानगरपालिका मध्ये 10वी पास उमेदवारांची तब्बल 01846 पदांसाठी भरती सुरू! | वेतन – 25,500 ते 81,900 रूपये.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

सरकारी नोकरी शोधत असाल आणि मुंबई मध्ये शोधत असाल तर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई मध्ये नवीन पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती मध्ये कार्यकारी सहाय्यक (लिपिक) ग्रेड ‘क’ ही एकूण 1846 पदे भरली जाणार आहेत. मुंबई मध्ये नोकरी मिळवायची ही चांगली संधी आहे. शैक्षणिक पात्रता पदवीधर व 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतील. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना दरमहा रु. 25,500 – रु. 81,900 (पे मॅट्रिक्स – M15) रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. वयोमर्यादा: अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांसाठी: किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी: किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे असणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन (Online) पद्धतीनें अर्ज करू शकणार आहेत. या भरती मध्ये उमेदवारांची निवड परीक्षा व्दारे केली जाणार आहे. परीक्षेच्या व्यवस्थापनामध्ये काही समस्या उद्भवल्यास त्याचा परिणाम ऑनलाइन परीक्षेवर किंवा निकालावर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशा परिस्थितीमध्ये परीक्षेस होणारा विलंब, उमेदवारांवर होणारा परिणाम, तसेच उमेदवारांना पुन्हा परीक्षा देण्यास लागू नये यासह सर्व बाबीचे निराकरण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न परीक्षा आयोजित करणाऱ्या संस्थेद्वारा करण्यात येईल. 20 ऑगस्ट 2024 ही अर्ज सुरू झाल्याची दिनांक आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 सप्टेंबर 2024 ही आहे.


error: Content is protected !!