
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
सरकारी नोकरी शोधताय? 7वी / 10वी / 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी शोधण्याची चांगली संधी आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनेवर सफाई कामगार पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज 20 जानेवारी 2025 रोजी किंवा त्या आधी पोहचेल या बेताने प्रबंधक, मूळ शाखा, उच्च न्यायालय, मुंबई वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, P.W.D. इमारत, फोर्ट, मुंबई- 400032. या पत्त्यावर फक्त स्पीड पोस्टाद्वारे (Speed Post) पाठवावेत.
अर्ज / कागदपत्रे इत्यादी समाविष्ट असलेल्या लिफाफ्यावर ‘सफाई कामगार पदासाठी अर्ज” असे लिहावे. सदर प्रक्रिये दरम्यान घेतल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीसाठी उमेदवारास स्वखर्चाने हजर रहावे लागेल. 20 जानेवारी 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.