मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 7वी /10वी / 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | Bombay High Court Bharti 2025

Bombay High Court Bharti 2025 : मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठाच्या आस्थापनेवर “शिपाई” या पदाची सद्यःस्थितीत रिक्त असणारी पदे व पुढील २ वर्षात रिक्त होणारी पदांकरिता उमेदवारांची निवड यादी साठी, ही जाहिरात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकास खालील नमुद पात्रता व अटींची पूर्तता करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी 7वी, 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. उमेदवारांनी खाली दिलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, आवश्यक माहिती, व अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Bombay High Court Bharti 2025 : Online applications are invited from candidates fulfilling the following qualifications and conditions as on the date of publication of this advertisement for the selection list of candidates for the posts of "Seponee" currently vacant at the Bombay High Court, Bench Establishment and for the posts falling vacant in the next 2 years.
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
पदाचे नाव : शिपाई.
शैक्षणिक पात्रता : 7वी / 10वी / 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (अधिकृत pdf जाहिरात वाचावी.)
मासिक वेतन : निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 16,600 ते 52,400 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
PDF जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे.
भरती कालावधी : कायमस्वरूपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी.
पदाचे नाव : शिपाई.
इतर आवश्यक पात्रता :
1) उमेदवार कमीत कमी सातवी उत्तीर्ण असावा.
2) उमेदवारास मराठी भाषा बोलता, वाचता आणि लिहीता येणे आवश्यक आहे.
3) उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम, सुदृढ आणि निर्व्यसनी असावा.
एकूण पदे : 045 पदे (उमेदवारांची निवड यादी: ३६ पदांकरिता आणि प्रतिक्षा यादी: ०९ उमेदवारांची).
नोकरी ठिकाण : नागपूर.
◾उमेदवार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा (अधिवास प्रमाणपत्र आवश्यक आहे).
◾उमेदवार करार करण्यास सक्षम असावा.
ज्या उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलविण्यात येईल, त्यांनी खालील कागदपत्रांच्या स्वः प्रमाणित छायांकित प्रती त्यांच्या मुळ प्रमाणपत्रांसह पडताळणी साठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणाव्यात :- 1} जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र / एस.एस.सी वे बोर्ड प्रमाणपत्र). (School Leaving Certificate/Birth Certificate issued by Competent Authority/Board Certificate of SSC)
2} शैक्षणिक पात्रतेच्या परिक्षेचे गुणपत्रक (७वी, १०वी, १२वी, इत्यादि).
3} शैक्षणिक पात्रतेच्या परिक्षेचे प्रमाणपत्र (७वी, १०वी, १२वी, इत्यादि)
4} जाहिरात प्रसिध्दी नंतरची तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेली चारीत्र्य संपन्नतेविषयीचे प्रमाणपत्र, प्रतिष्ठीत व्यक्तीचा हुद्दा, पत्ता व फोन नंबर नमुद असावा (जाहीरातीसोबत “नमुना ब” नुसार)
5} तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला (मागासवर्गीयांसाठी)
6} महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
7} सेवायोजन कार्यालयात नोंदणी केली असल्यास, नोंदणी प्रमाणपत्राची प्रत.
8} लहान कुटुंबाबाबत स्वयं घोषणापत्र (जाहिरातीसोबत “नमुना अ नुसार).
9} उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची (कार्यालयाची) मंजूरी घेतल्याचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील.
10} उमेदवाराच्या नावात बदल झालेला असल्यास नावाच्या बदलाबाबत शासकीय राजपत्रावी विवाह नोंदणी प्रमाणपत्राची प्रत सादर करावी.
11} संबंधीत इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये दिलेल्या माहितीसह.
12} न्यायालय प्रशासनाने मागणी केलेले इतर कोणतेही दस्तऐवज.
अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : 04 मार्च 2025 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!