पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
बॉम्बे उच्च न्यायालय, मुंबई मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. स्वयंपाकी ही पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण रिक्त 02 पदे भरली जाणार आहेत. मुंबई मध्ये चांगल्या वेतनाची नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी असू शकते. या भरतीसाठी तुमची शैक्षणिक पात्रता कमीत कमी चौथी पास असणे आवश्यक आहे. तुम्ही 7वी, 10वी, 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण असाल तर या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
वयोमर्यादा 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट) असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. ऑफलाईन पद्धतीनें अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्याचा पुर्ण पत्ता – प्रबंधक (कार्मिक), मुंबई उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रूग्णालय आवार, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई- ४००००१. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 ही आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.