सरकारी नोकरी : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत 7वी / 10वी / 12वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती! | मासिक वेतन – 16,600 ते 52,400 रूपये.

Pdf जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्जयेथे क्लीक करा
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

सरकारी नोकरी शोधताय? बॉम्बे उच्च न्यायालय नागपूर बेंच मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये शिपाई ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये एकूण 045 पदे (उमेदवारांची निवड यादी: ३६ पदांकरिता आणि प्रतिक्षा यादी: ०९ उमेदवारांची) भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना १६,६०० ते ५२,४०० रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे. या भरतीसाठी पात्र होण्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही उमेदवार कमीत कमी सातवी उत्तीर्ण असावा, उमेदवारास मराठी भाषा बोलता, वाचता आणि लिहीता येणे आवश्यक आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

या भरतीसाठी वयोमर्यादा: अराखीव (खुला) – 18 ते 38 वर्षे. अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती किंवा इतर मागास प्रवर्ग किंवा महाराष्ट्र शासनाने निर्दिष्ट केलेल्या विशेष मागासवर्गीय उमेदवारांसाठी: 18 ते 43 वर्षे असणे आवश्यक आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करू शकणार आहेत. नियम व अटी : उमेदवारास नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरविण्यात आले नसावे किंवा कोणत्याही न्यायालय एम.पी.एस.सी यु.पी.एस.सी किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याव्दारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडप्रक्रीयेमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे काढून टाकले नसावे किंवा अपात्र ठरविले नसावे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

परीक्षेवा प्रकार, परीक्षा स्थगित करणे व रद्द करणे, अंशतः बदल करणे, याबाबत सर्व अधिकार प्रशासन मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ, नागपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत याबाबत कोणालाही कोणत्याही प्रकारचा दावा सांगता येणार नाही. निवड प्रक्रिया सुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी अर्जदाराने अर्जात दिलेली माहिती खोटी सादर केल्याचे किंवा खरी माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास, त्याची उमेदवारी नियुक्ती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल अथवा नियुक्ती झाल्यास त्याला तिला पदावरून काढुन टाकण्यात राईल.

अर्जदार जाहिरातीमध्ये नमुद केलेल्या पात्रता व अटी शर्तीनुसार पात्र आहे असे समजुन त्याला लेखी परीक्षेकरीता तात्पुरता प्रवेश देण्यात येईल मुलाखती । नियुक्ती पूर्वी उमेदवाराची जाहिरातीनुसार पात्रता तपासण्यात येईल. त्यावेळी उमेदवार अपात्र आढळल्यास त्याचे तिचे नाव निवडप्रक्रीयेतुन वगळण्यात येईल.

भरती प्रक्रियेबाबत कोणत्याही बदलाबाबतची सूचना उशीरा मिळाल्यामुळे नियोजित तारखेस व वेळेस लेखी परिक्षेस, शारीरिक क्षमता, विशेष अर्हता चाचणी किंवा मुलाखतीस उमेदवार अनुपस्थित राहिल्यास, मुंबई उच्च न्यायालय, नामपूर खंडपीठ, नामपुर प्रशासनाकडून या बाबत कोणतीही तक्रार दावा विचारात घेतला जाणार नाही किंवा ऐकला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ०४ मार्च २०२५ ही आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

नमस्कार, मी रवी गावित. मी mnnokari.com वेबसाईटचा Founder आहे. मी शाळेत, कॉलेजला असल्यापासून मला वाचन, लेखनाची आवड होती. सोशल मीडिया वरून माहिती मिळाल्या नंतर मी 2021 या वर्षी माझ्या Blogging च्या प्रवासाला सुरुवात केली. मी ब्लॉगिंग करण्याअगोदर 2 वर्ष देशदूत या वृत्तपत्रासाठी पत्रकार म्हणून काम केले आहे. माझ्याविषयी अधिक माहितीसाठी खाली तीन डॉट वर क्लीक करून मला इंस्टाग्रामवर Follow करा. 👇


error: Content is protected !!