Central Bank of India Bharti 2025 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत (ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था) साठी 2024-25 या वर्षासाठी कार्यालयीन सहाय्यक, अटेंडर आणि वॉचमन कम गार्डनर व इतर पदांची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी 7वी / 10वी / 12वी आणि पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी खूप मोठी संधी निर्माण झालेली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, भरती बद्दलची आवश्यक माहिती, pdf जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.
Central Bank of India Bharti 2025 : Applications are invited from eligible candidates for filling up the vacant posts of Office Assistant, Attendant and Watchman cum Gardener and other posts for the year 2024-25 under Central Bank of India (Rural Self-Employment Training Institute).
⚠️ महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
◾भरती विभाग : सेंट्रल बँक ऑफ इंडिया व सामाजिक उत्थान अवमप्रशिक्षण संस्था द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : कार्यालयीन सहाय्यक, पहारेकरी व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : 7वी / 10वी / 12वी / पदवीधर व इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मासिक मानधन : 60,000 ते 20,000 रूपये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वेतन दिले जाणार आहे.
◾अधिकृत जाहिरात, अर्ज व अधिक माहिती खाली दिली आहे.
PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
अर्ज | येथे क्लीक करा |
◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾भरती कालावधी : उमेदवाराची नियुक्ती एक वर्षाच्या कालावधीसाठी कंत्राटी पद्धतीने केली जाईल.
◾पदाचे नाव व इतर आवश्यक पात्रता :
▪️प्राध्यापक : पदवीधर / पदव्युत्तर पदवीधर म्हणजेच एमएसडब्ल्यू / ग्रामीण विकासात एमए / समाजशास्त्र / मानसशास्त्रात एमए / बीएससी (कृषी) / बी.एडसह बीए.
▪️ऑफिस असिस्टंट : पदवीधर म्हणजेच बीएसडब्ल्यू /बीए/ बी.कॉम. / संगणकाचे ज्ञान.
▪️अटेंडंट : 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
▪️वॉचमन कम माळी : 7वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
◾एकूण पदे : 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : अकोला. (Bank Jobs in Akola)
◾अर्ज फी : यासाठी कोणतेही अर्ज शुल्क विहित केलेले नाही.
◾पात्र उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : अर्ज पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज दिलेल्या नमुन्यात सादर करावे लागतील. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 24.01.2025 आहे. विहित तारखेपलीकडे कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रादेशिक व्यवस्थापक / सह-अध्यक्ष, जि. स्तर RSETI सल्लागार समिती (DLRAC), सेंट्रल बँक ऑफ इंडिया, प्रादेशिक कार्यालय-अकोला, “मंगेश” मंगल कार्यालय, आदर्श कॉलनी, अकोला 444004.
◾अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.